IAS Pooja Khedkar And Manorama Khedkar  Saamtv
मुंबई/पुणे

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरांच्या आईला अखेर अटक, महाडमधील हॉटेलमध्ये लपून बसल्या होत्या मनोरमा खेडकर

Manorama Khedkar Arrested: शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून त्या फरार होत्या अखेर आज त्यांना महाडमधून अटक करण्यात आली आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकरी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. महाडमधून पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केली. त्यांना पुण्यामध्ये आणण्यात येणार आहे. दुपारपर्यंत त्यांना पुण्यातील पौड पोलिस ठाण्यात आणण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून त्या फरार होत्या अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यातल्या महाड येथून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी आज पहाटे मनोरमा खेडकर यांना महाडमधील हॉटेलमधून अटक केली. मनोरमा खेडकर महाड तालुक्यातील हिरकणवाडीमधील पार्वती हॉटेलमध्ये लपून बसल्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिस मनोरमा खेडकर यांचा शोध घेत होते. अखेर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करून पोलिस त्यांना पुण्याला घेऊन येत आहेत. तर पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे अजूनही फरार आहेत. त्याचा शोध पुणे पोलिस घेत आहेत.

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मनोरमा खेडकर यांनी जमिनीच्या वादातून मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवून धमकावले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यामुळे मनोरमा खेडकर पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अनेकदा फोन केले पण त्या फोन करण्यास टाळाटाळ करत होत्या. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा खेडकर या फरार होत्या. अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, सरकारने मंगळवारी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित केले. त्यांना 23 जुलैपर्यंत लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसूरी येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरी सेवा परीक्षेत निवड होण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणात सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर या खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह केल्यामुळे चर्चेत आल्या. त्यानंतर हे प्रकरण खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र इथपर्यंत पोहोचलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT