Aditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

नौदलाच्या कार्यक्रमात मी राजकीय भाष्य करणार नाही- आदित्य ठाकरे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर ई़डीने (ED) कारवाई केली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर ई़डीने (ED) कारवाई केली आहे. या कारावाई संदर्भामध्ये प्रसारमाध्यमांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले आहे की, नौदलाच्या कार्यक्रमामध्ये राजकीय भाष्य मी करणार नाही. ही जागा राजकारणावर भाष्य करण्याची नसल्याचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यावेळी म्हणाले आहेत. यासंदर्भामध्ये मी सभागृहात बोलणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

हे देखील पहा-

नौदलाने (Navy) आयोजीत केलेल्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे आले असता, त्यांना प्रसारमाध्यमांशी प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी यावर अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, देशाचे रक्षण करणे ही भाग्याची गोष्ट असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले होते. मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्राचे (Maharashtra) नौदलाबरोबर एक वेगळे नात आहे. नौदलाची खूप मोठी परंपरा आहे. प्रत्येकाला आपल्याला अभिमान वाटणार आहे, असे नौदलाचे काम असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई़डीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल ६.४५ कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील ११ सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे.

श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचे सांगितले जात आहे. ईडीने २०१७ मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधामध्ये मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल २१ कोटी रुपयांची मालमत्ता याअगोदर जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती. ईडीने प्रसिद्धीपत्रक काढून या कारवाईची माहिती दिली आहे. ६ मार्च २०१७ मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

२०१७ मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधामध्ये ही कारवाई होती. मात्र, आज झालेली जप्तीची कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या म्हणजेच श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या रहिवासी सदनिका आहेत. या सदनिका ठाण्यातील निलांबरी गृहप्रकल्पामधील आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT