Nana Patole Saam TV
मुंबई/पुणे

फोन टॅपिंग प्रकरणात माझी बदनामी, रश्मी शुक्लांवर ५०० कोटींचा दावा ठोकणार - पटोले

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोन टॅपिंग प्रकरणात सहभाग असेल तर त्यांच्यावर ही कारवाई करणार.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) पुणे कमिशनर असतांना माझा नंबर टॅपिंग केला. माझी बदनामी करण्याचे काम केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माझी व्यक्तिगत बदनामी झाली आहे. रश्मी शुक्ला आणि संबंधित व्यक्तींवर 500 कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोन टॅपिंग प्रकरणात सहभाग असेल तर त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल असही पटोले म्हणाले.

यावेळी त्यांनी राज्यपालांवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राज्यपाल करत आहेत. राज्यपालांचा आम्ही अपमान करत नाही पण त्या पदावर बसलेली व्यक्ती चुकीची आहे. काँग्रेस यापुढे "राज्यपाल गोबॅक" आंदोलन करायलाही मागेपुढे पाहणार नाही असा इशारा देखील पटोले यांनी दिला.

दरम्यान केंद्र सरकार परराष्ट्रीय धोरणात अपयशी ठरले आहे. आता नरेंद्र मोदी यांचा युक्रेन मधून भारतीयांना सोडून आणण्यात आपले सामर्थ्य आहे हे सांगून पाठ थोपटून घेणे कितपत योग्य आहे असा टोलाही त्यांनी मोदींंना लगावला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Failure Symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' बदल; वेळीच द्या लक्ष, नाहीतर...

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये राडा; धक्काबुक्की करत खलिस्तानीची घोषणाबाजी

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या

Genelia Deshmukh: एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं, पाहा जेनिलियाचे खास फोटो

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवले; मुलाला फाशी द्या! संतापलेल्या बापाची मागणी|VIDEO

SCROLL FOR NEXT