Ganesh Naik Saam TV
मुंबई/पुणे

...तर माझं अपहरण होऊ शकतं; गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या महिलेचा Video व्हायरल

गणेश नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून जर नाईकांना अटकपूर्व जामीन भेटला तर माझ्यासह मुलाच्या जीवाला धोका असल्याचं वक्तव्य पीडितने केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे -

मुंबई : भाजप नेते आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, गणेश नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात (Thane Sessions Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून जर नाईकांना अटकपूर्व जामीन भेटला. तर माझ्याह मुलाच्या जीवाला धोका असल्याचं वक्तव्य पीडित महिलेने केलं आहे.

गणेश नाईक यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या पीडित महिलेने आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यासाठी एक व्हिडीओ प्रसारमाध्यमांकडे सुपुर्त केला आहे. या Video मध्ये तिने राज्य सरकारने आपणाला दिलेल्या संरक्षणाबबात आभार मानले असून सरकारने आतापर्यंत मला खूप मदत केली असल्याचंही सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, गणेश नाईकांना जामीन मिळाला आणि त्यांची सुटका झाली तर माझ्या जीवाला धोका आहे. ते माझ आणि मुलाचं अपहरण करतील तसंच दबावाने माझ्याकडून काहीही लिहून घेऊ शकतात. यासाठी मला जनतेच्या सहकार्याची गरज असल्याची विनंती पीडित महिलेने व्हिडिओ द्वारे केली आहे. हा व्हिडीओसध्या सोशल मीडियावरती (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठापणाला

SCROLL FOR NEXT