crime news saam tv
मुंबई/पुणे

पुणे हादरले! पत्नीची निर्घृण हत्या करून पतीनेही संपवले आयुष्य; कारण वाचून पायाखालील जमीन सरकेल

Pune crime news: पुणे जिल्ह्यातील शेलूगाव येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

Namdeo Kumbhar

रोहिदास घाडगे, पुणे प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेलूगाव (ठाकरवस्ती) येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुहेरी मृत्यूच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या शेलूगाव ठाकरवस्ती येथे पती-पत्नीमधील वादाचे पर्यवसान दुहेरी मृत्यूत झाले. कौटुंबिक वादाच्या भरात पतीने पत्नीचे डोके जमिनीवर जोराने आपटून तिची हत्या केली. त्यानंतर स्वतःही घरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

दादाभाऊ बिराजी कडाळे(वय.५५ वर्षे, रा.ठाकरवस्ती,शेलू) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिनाबाई रामदास केदारी (वय ३०) तिचे पती नवनाथ खेमा केदारी किरकोळ कारणावरून वादावादी झाली त्याचे पर्यवसान हाणामारी होऊन नवनाथ याने पत्नी पिनाबाई हिचे डोके जमिनीवर आपटून खून केल्यानंतर नवनाथ केदारी यांनीही राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी (दि.१७) सकाळी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी करून काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पती-पत्नीमध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला होता, याचा पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT