Pune NEws Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : बायकोनं जेवण दिलं नाही, संतापलेल्या नवऱ्याचं भयंकर कृत्य; पुण्यात हादरवणारी घटना

आरोपी पती परशुराम जोगण याला पोलिसांनी अटक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन जाधव

पुणे : जेवण न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्याच्या अप्पर इंदिरानगर परिसर रविवारी रात्री या घटनेने हादरला. पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक केली आहे.

सविता संदीप औचिते असं मृत महिलेचं नाव आहे. तर आरोपी पती परशुराम जोगण याला पोलिसांनी अटक केली आहे. गणेश दत्तात्रय शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

आरोपी पती परशुराम हा रिक्षा चालक आहे. भाड्याची रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. तर मयत महिला ही त्याची दुसरी पत्नी होती. रविवारी रात्री त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. मयत पत्नीने दारू प्यायली होती होती, तसेच तिने त्याला जेवणही दिले नाही. याचाच राग मनात धरून आरोपीने पत्नीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तिची हत्या केला.पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT