धक्कादायक! कोरोनाने पतीचा मृत्यू तर पत्नीने केली आत्महत्या Saam Tv
मुंबई/पुणे

नवऱ्याने न विचारता पाणीपुरी आणल्यानं बायकोनं केली विष पिऊन आत्महत्या

नवरा बायकोत या कारणावरून तब्बल तीन दिवस वाद सुरू होता.

अश्विनी जाधव केदारे साम टीव्ही पुणे

पुणे: पुण्यामध्ये चक्क नवऱ्याने न विचारता पाणीपुरी आणल्याने नवरा बायकोत वाद झाल्याने बायकोने या वादानंतर विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नवरा बायकोत या कारणावरून तब्बल तीन दिवस वाद सुरू होता. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. प्रतिक्षा गहिनीनाथ सरवदे (वय 23) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती गहिनीनाथ सरवदे (वय 33) याला पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत प्रकाश भिसे (वय 55) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मृत प्रतीक्षा आणि बहिणींना यांचे 2019 मध्ये लग्न झाले होते. या दोघांनाही एक मुलगा आहे. गहिनीनाथ पुण्यातील एका चांगल्या कंपनीत कामाला होता. बायको मात्र बीड जिल्ह्यातील गावात राहत होती. काही दिवसांपूर्वी त्याने बायकोला पुण्यात आणले होते.

तीन दिवसांपूर्वी कामावरून घरी परत जात असताना गहिनीनाथने पाणीपुरी नेली होती. परंतु घरी गेल्यानंतर मला न विचारता पाणीपुरी का आणली असे सांगत प्रतिक्षाने भांडण करण्यास सुरुवात केली. याच कारणावरून त्यांच्या मागील दोन दिवसांपासून वाद सुरू होते. याच वादातून प्रतिक्षाने शनिवारी राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना रविवारी तिचा मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

Vidhan Sabha Election Result : अकोल्यात बंडखोरीचा भाजपला फटका; काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी

Nanded News : नांदेडमध्ये मतमोजणीदरम्यान दोन गटात तूफान राडा

SCROLL FOR NEXT