Manasvi Choudhary
वस्तू आणि सेवा कर यांनी चारचाकी वाहनांवरील करांत मोठी कपात केली आहे.
त्यामुळेच आता नवीन खरेदीकरांना मोठा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे.
किआ इंडियाने वस्तू व सेवा करांमधील बदलांच्या घोषणांचा फायदा ग्राहकांना होईल असं स्पष्ट केलं आहे.
किंमतीवरील कपात कंपनीच्या संपूर्ण इंटरनल कम्बशन इंजिन पोर्टफोलिओवर लागू होईल. यानुसार नवीन किंमती २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील.
माहितीनुसार, ६ मॉडेल्सच्या किमती ४८,५१३ रूपयांवरून ४.४८ लाख रूपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.
किआ इंडियाच्या पोर्टफोलिओमध्ये सेल्टोस, सिट्रोस, सोनेट, केरेन्स क्लॅव्हिस, केरेन्स क्लॅव्हिस ईव्ही, कार्निव्हल या वाहनांचा समावेश आहे.
किआच्या सब - फोर मीटर एसयूव्ही सोनेटची किंमत ८ लाख ते १५.६४ लाखांच्या दरम्यान आहे. या एसयूव्हीची किंमत १, ६४,४७१ रूपयांनी कमी करण्यात आली आहे.
किआ सिरोसची किंमत ९.५० लाख ते १७.८० लाख रूपयांदरम्यान आहे. ही एसयूव्ही १,८६,००३ रूपयांनी स्वस्त झाली आहे.
सध्या किआ सेल्टोसची किंमत ११.१९ लाख ते २०.५६ लाख रूपयांच्या दरम्यान आहे. तिची किंमत ७५,३७२ रूपयांनी कमी करण्यात आली आहे.
कॅरेन्सचे प्रिमियम मॉडेल क्लोविस ७८,६७४ रूपयांनी स्वस्त झाले आहे. त्याची किंमत ११.५० लाख रूपयांपासून ते २१.५० लाख रूपयांपासून ते २१.५० लाख रूपयांपर्यंत आहे.