hundreds of fish died in indrayani river today saam tv
मुंबई/पुणे

Indrayani River Polluted : प्रदुषित इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच, प्रशासन आजही ढिम्म

Dehu : या साेहळ्यासाठी राज्यातून लाखो वारकरी देहूत दाखल होतात. या वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीत वारकरी स्नान करतात.

दिलीप कांबळे

Maval :

इंद्रायणी नदीत शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना आज (गुरुवार) पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. मृत माशांचा खच डोहात तरंगताना ग्रामस्थांना दिसला. देहू येथील पर्यावरणप्रेमींनी देहू नगरपंचायत प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत मृत मासे एकत्र करून त्यांची विल्हेवाट लावली. प्रशासन इंद्रायणी नदी स्वच्छ कधी करणार असा सवाल स्थानिक करु लागले आहेत. (Maharashtra News)

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा (sant tukaram maharaj beej sohala) 13 दिवसांवर येऊन ठेपला आहे. या साेहळ्यासाठी राज्यातून लाखो वारकरी देहूत दाखल होतात. या वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीत वारकरी स्नान करतात.

सध्या नदीत मासे मरु लागले आहेत. गेल्या आठ दिवसांतील आजची ही दुसरी घटना आहे. शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याने या माशांचा खच इंद्रायणी नदीच्या डोहात तरंगत होता. पर्यावरणप्रेमी सोमनाथ मसूडगे म्हणाले देहू नगरपंचायतीने इंद्रायणी नदीची स्वच्छता करणे गरजेचे आहे. नदी प्रदुषित हाेत असल्याने भाविकांच्या आराेग्याचा प्रश्न देखील निर्माण हाेण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT