Banganga Tank  Social media
मुंबई/पुणे

Banganga Tank : मुंबईच्या बाणगंगा तलावात आढळले शेकडो मृत मासे; लोकांची एक चूक माशांसाठी ठरली घातक

Banganga Tank : माणसाच्या एका चुकीमुळे बाणगंगा तलावातील माशांचा जीव गेलाय.

Bharat Jadhav

Banganga Tank Dead Fish Found:

सोमवारी सकाळी मुंबईतील वाळकेश्वर मंदिरातील बाणगंगा पाण्याच्या टाकीत शेकडो मृत मासे तरंगताना आढळून आले. या टाकीतील माशांसाठी यंदाचा पितृ पक्ष परत घातक ठरलाय. दरवर्षाप्रमाणे पितृ पक्षाच्या विधीनंतर बाणगंगाच्या तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळत असतात. (Latest News)

या पितृ पक्षाच्या काळात विविध पदार्थ अर्पण करून लोक त्यांच्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहतात. पितरांना अन्न अर्पण केल्यानंतर लोकं तलावात अन्न विसर्जित करत असतात. तलावात टाकलेल्या अन्नामुळे पाण्यातचे प्रदुषण होते, त्यामुळे माशांचा मृत्यू होतो. टाकीतील पाणी स्थिर असल्याने ऑक्सिजन त्वरीत कमी होतो आणि मोठ्या प्रमाणात मासे मरतात.

आधीही या कुंड्यातील मासे मृत आढळले आहेत. दरम्यान बीएमसीकडून लोकांना फलक लावून देखील याबाबतच्या सूचना केल्या जातात. “निर्माल्य, नैवेद्य काहीही थेट पाण्यात टाकू नये. त्याऐवजी एकदा टाकीत बुडवा आणि नंतर जागोजागी ठेवण्यात आलेल्या मोठ्या निर्माल्य कलशांमध्ये टाका”, असे निर्देश देणारे फलक लावलेत. मात्र या नियमांकडे लोक दुर्लक्ष करतात.

दरम्यान काही दिवसापूर्वी ठाणे जिल्ह्याच्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कृत्रिम तलवातून ५९ कासव जप्त केले होते. ठाणे वनविभाग आणि रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेलफेअर (RAWW) यांनी संयुक्त कारवाईत या कासवांची सुटका केली होती. RAWWचे पवन शर्मा म्हणाले, "५९ कासवांपैकी २२ कासवांची मूळ प्रजाती होती. यात भारतीय फ्लॅप-शेल, ब्लॅक पॉन्ड आणि इंडियन टेंट टर्टल्स, ज्यांना वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत संरक्षित केले गेले आहे. तर उर्वरित ३७ लाल कानांचे होते ही स्लाइडर एक विदेशी प्रजाती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress third list : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? वाचा

Amit Thackeray : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? अमित ठाकरेंनी केलं मोठं वक्तव्य, VIDEO

MS Dhoni: आयपीएल विश्वातील सर्वात मोठी घडामोड; एमएस धोनी CSK मधून खेळणार?, पडद्यामागं काय घडलं?

Nawab Malik : अजित पवारांची मनधरणी अपयशी; नवाब मलिक निवडणूक लढण्यास ठाम, कुठून भरणार अर्ज? VIDEO

Love Rashifal: शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे ५ राशींच्या लव्ह लाईफमध्ये येणार आनंदी आनंद

SCROLL FOR NEXT