Sambhaji Nagar tanisha Bormanikar Score 100 Percent Saam Tv
मुंबई/पुणे

Saam Exclusive : बारावीला १०० टक्के मिळवणाऱ्या तनिषा बोरमणीकरनं कशी केली होती परीक्षेची तयारी? बघा VIDEO फक्त 'साम टीव्ही'वर

Sambhaji Nagar Tanisha Bormanikar Score 100 Percent : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा आज निकाल जाहीर झाला. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या परिक्षेत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या तनिषा बोरमणीकरनं १०० टक्के गुण मिळवले आहेत.

डॉ. माधव सावरगावे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा आज निकाल जाहीर झाला आहे. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या परिक्षेत महाराष्ट्रातील संभाजी नगरच्या एका विद्यार्थिनीने १०० टक्के गुण मिळवले आहे. संभाजी नगरच्या तनिषा बोरमणीकर या विद्यार्थिनीने हे यश मिळवले आहे.

तनिषा ही छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी कॉलेजमध्ये शिकत होती. बारावीच्या परिक्षेत १०० टक्के गुण मिळवणारी तनिषा ही एकमेव मुलगी आहे. तनिषाला १०० टक्के गुण मिळाल्याने तिच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे. तनिषाच्या शाळेच्या शिक्षकांनी देखील तिचे खूप कौतुक केले आहे.

तनिषाने साम टीव्हीशी बोलताना सांगितले की, मला खरं तर ९५ टक्के मिळतील, अशी आशा होती. परंतु १०० टक्के मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. मी वर्षभर अकाउंट्स या विषयाचा अभ्यास केला. त्या विषयावर जास्त भर दिला. शेवटच्या दोन महिन्यात मी बाकीच्या विषयांचा अभ्यास केला. माझ्या शिक्षकांनी माझी खूप साथ दिली. मी बुद्धिबळ खेळायची. त्यामुळे माझा अभ्यास बुडायचा. माझ्या शिक्षकांनी आणि कॉलेजने खूप सपोर्ट केला. मी खेळामुळे कॉलेजला जास्त जाऊ शकले नाही. पण शिक्षकांच्या सपोर्टने मी हे यश प्राप्त केलं आहे.

तनिषाचा आवडता विषया कोणता असे तिला विचारण्यात आले होते. त्यावर ती म्हणाली की, अकंउट्स विषय माझा आवडता होता. त्यात मला ९५ मार्क्स मिळाले. मला ओसीएम, इकोनॉमिक्स आणि पाली या विषयात १०० मार्क्स मिळाले.

बारावीच्या परिक्षेत एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षी राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. या वर्षी १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. त्यापैकी एकूण १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी पास झाले आहेत. यावर्षी एकूण ९१.६० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. राज्यात कोकण विभागात ९७.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT