Kherwadi Police Station in Bandra Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: वडिलांचा PF काढून देतो, माझी ती इच्छा पूर्ण कर; कंपनीच्या मॅनेजरची तरुणीकडे शरीरसुखाची मागणी

Satish Daud

HR Manager Demand for physical relations with woman

वडिलांचा भविष्य निर्वाहनिधी अर्थात ईपीएफ काढून देतो. माझी शरीरसुखाची मागणी पूर्ण कर, अशा आशयाचा मॅसेज एका नामांकित कंपनीच्या एचआर मॅनेजरने २३ वर्षीय तरुणीला पाठवला. मॅसेज पाहून तरुणीला धक्काच बसला. तिने तातडीने पोलिसांत धाव घेत HR मॅनेजरविरोधात तक्रार दाखल केली. ही संतापजनक घटना मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित HR मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. सुशांत असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी एका गरीब कुटुंबातील असून घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.

तरुणीचे वडील माझगाव येथील एका कंपनीत काम करत होते. ती १५ वर्षांची असताना २०१५ मध्ये तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. दरम्यान, वडिलांच्या पगारातून कापलेल्या ईपीएफची रक्कम मिळावी म्हणून तरुणीने ऑफिसमध्ये अर्ज दाखल केला. (Breaking Marathi News)

मात्र, ५ वर्ष पाठपुरवठा करूनही तिला पीएफचे पैसे मिळाले नाहीत. जेव्हा तरुणीने कंपनीच्या HR मॅनेजर सुशांत सोबत संपर्क साधला, तेव्हा त्याने तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. इतकंच नाही, तर तुझ्या वडिलांच्या पीएफचे पैसे काढून देतो, फक्त माझी शरीरसंबंधाची इच्छा पूर्ण अशी मागणी आरोपी सुशांतने तरुणीकडे केली.

याप्रकरणी तरुणीने पोलिसांत धाव घेत आरोपी सुशांतविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT