HSc Result Saam Tv
मुंबई/पुणे

बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?; जाणून घ्या स्टेप्स

उद्या, बुधवारी दुपारी १ वाजता बारावी निकाल लागणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाची (HSC) तारीख जाहीर केली आहे. उद्या, बुधवारी (८ जून रोजी) दुपारी १ वाजता बारावी निकाल लागणार आहे. मागिल दोनवर्षापासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन (Online) पद्धतीने कॉलेज झाले आहेत. बारावीची परीक्षा ऑफलाइन झाली होती. बारावीच्या निकालाची उत्सुकता पालकांना लागली आहे.

बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दिसणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल मोबाईलवरच पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर जवळ ठेवणे गरजेचे आहे. मोबाईलवरुन आपला निकाल डाऊनलोड करता येणार आहे. (HSC Result Latest News)

बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

बारावीचा निकाल पाहण्यासाठी अगोदर आपल्याला HSC बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – mahresult.nic.in

वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला HSC Result 2022 ही लिंक दिसेल, या लिंकवर क्लिक करा.

यात तुम्हाला एक रखाना दिसेल यात तुचा रोल नंबर आणि आईचे नाव भरा.

यानंतर तुम्हाला ''View Result'' हा ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करा.

यात तुम्हाला बारावीचा दिसेल

पुढे तुम्हाला Save आणि Download हे ऑप्शन दिसतील या निकालाची तुम्ही प्रिंट काढू शकता.

निकाल या वेबसाईटवर पाहू शकता

mahresult.nic.in

mahasscboard.in

results.nic.in

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी आणि ७ लाख ४७ हजार ४८७ विद्यार्थीनींनी परीक्षा दिली होती. यंदा बारावीची परीक्षा १५ दिवस उशीरा सुरु झाली होती.दुसरीकडे पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार घातल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र आता बुधवारी ८ जून रोजी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.

शाळा तिथे केंद्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परिक्षा ऑनलाइन घ्यायच्या की ऑफलाइन घ्यायच्या यावर चर्चा सुरू होत्या. अखेर या परिक्षा ऑफलाइन पद्धतीने झाल्या. या वर्षी परिक्षेदरम्यानचा गोंधळ टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कोविड सुरक्षिततेचा विचार करुन शाळा तिथे केंद्र ही सुविधा लागू केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्ये रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

SCROLL FOR NEXT