Big news! परमबीर-वाझे भेटीची चौकशी होणार- गृहमंत्री...(पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

Big news! परमबीर-वाझे भेटीची चौकशी होणार- गृहमंत्री...(पहा व्हिडिओ)

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीची चौकशी करण्यात येणार आहे. एखाद्या केसमधल्या आरोपीला भेटता येत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : खंडणी प्रकरणात चौकशी सुरू असलेले परमबीर सिंग अनेक महिन्यांपासून गायब झाले होते. त्यांना कोर्टाने देखील फरार घोषित केले होते. यानंतर परमबीर सिंग मुंबईतील चंदीवाल आयोगासमोर चौकशीला उपस्थित राहिले. यावेळी वाझेची सुनावणी देखील पार पडली आहे. सचिन वाझे मनसुख हिरेन हत्येशी संबंधित असल्यामुळे त्याची देखील चंदीवाल आयोगाकडून चौकशी सुरू आहे. सुरुवातीस दोघांमध्ये काही सेकंद बोलणे झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पहा व्हिडिओ-

मात्र, दोघेही तासभर सोबत असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर गृहमंत्री वळसे- पाटील यांनी संबंधित प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. गृहमंत्री वळसे पाटील यांनी वाझे- सिंग यांच्या भेटीवर बोलताना मोठा निर्णय घेतला आहे. कालच्या भेटीविषयी मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत, असे गृहमंत्री यावेळी म्हणाले आहेत. आता या भेटीने काँट्रोव्हर्सी तयार होणार आहे.

पुढील काळात ही भेट दोघांच्या विरोधामध्ये जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. परमबीर सिंग यांना पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीवर कोणताही दबाव नाही. असा दबाव असण्याचे काही कारण नाही. परमबीर सिंग याच्या विरोधामध्ये ज्या ज्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्या ठिकाणी ते जबाब नोंदवत आहेत, असे वळसे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, परमबीर सिंग यांनी मुंबईमधील किल्ला कोर्टात हजेरी लावली आहे. न्यायालयाने परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेने कोर्टामध्ये परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याची मागणी केली होती. ज्युडिशीअल कस्टडीत असताना बाहेरील व्यक्तींना भेटण्याची परवानगी नसते. मात्र, वाझे आणि माजी आयुक्तांमध्ये झालेल्या भेटीवर मुंबईच्या पोलीस आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे वळसे पाटील म्हणाले आहेत.

Edited by- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: भयंकर! पतीनं परदेशात दुसरीसोबत लग्न केलं; रागाच्या भरात पहिल्या पत्नीनं पोटच्या ४ मुलांना संपवलं

मोठी बातमी ! तरुण न्यायाधीशांनी आयुष्य संपवलं; बाथरूममध्ये आढळला मृतदेह

Accident: धावत्या कारवर कोसळलं भलं मोठं झाड, ४ शिक्षिकांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाची हजेरी

Nasarapur Case: नसरापूर घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा रास्तारोको, नवले पुलावर मोठी वाहतूक कोंडी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT