Holi Tree cuting Saam Tv
मुंबई/पुणे

Holi 2025 : होळीसाठी झाडं तोडाल तर खबरदार! भरावा लागेल 1 लाख रुपयांचा दंड

Pune News : होळीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी झाडे तोडली जातात. हा प्रकार थांबावा यासाठी पुणे महानगरपालिकेने वृक्षतोड केल्यास १ लाख रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याची घोषणा केली आहे.

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

होळी सण भारतभर साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये होळीला प्रचंड महत्त्व आहे. होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते. यासाठी बरेचसे लोक झाडे तोडतात. अवैध्यरित्या झाडे तोडण्यावर वचक बसवण्यासाठी पुणे महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता होळीसाठी झाडे तोडल्यास १ लाख रुपयांचा दंड बसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झाडे तोडणाऱ्यांवर पुणे महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जर कोणी झाड तोडताना सापडला, तर त्याचा दंड म्हणून १ लाख रुपयांचा दंड बसणार आहे. यासंबंधित पत्रक महानगरपालिकेने प्रसिद्ध केले आहे. यानुसार झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

होळीनिमित्त अनेक ठिकाणी लाकूडतोड केली जाते. होलिका दहनसाठी अनेकजण झाडे तोडतात. यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका शहरातील वन विभागाच्या हद्दीत असलेली तसेच नदीकाठ व आसपासच्या परिसरातील झाडे तोडीवर करडी नजर ठेवणार आहे.

महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम २०२१ या कायद्यानुसार, विनापरवाना झाडे तोडणे, झाडे जाळणे हा दंडात्मक गुन्हा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून पुणे महापालिका झाडे तोडणाऱ्या व्यक्तींकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीच्या जिंतूर तालुक्यात पाणी टंचाई

Fort In Dhule : शिखरावरून दिसते खानदेशाचे विहंगम दृश्य, धुळे येथे लपलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

Explainer: एका वर्षापर्यंत सोनं खरेदी करू नका! पीएम मोदींनी असं का केलं आवाहन, गोल्डमुळे अर्थव्यवस्थेचं कसं होतंय नुकसान?

Kutra Chavlyavar Upay: कुत्रा चावल्यावर काय करावे? घरगुती उपाय वाचा

Post Office Scheme: दिवसाला ३३३ रुपये गुंतवा अन् ₹१७००००० मिळवा; पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

SCROLL FOR NEXT