Gorai Beach accident saam tv
मुंबई/पुणे

Gorai Beach accident: गोराई बीचवर हिट अँड रनचा थरार; भरधाव गाडीची आधी रिक्षाला धडक, नंतर महिलांना उडवलं

Gorai Beach accident today: गोराई बीचवर भरधाव एसयूव्हीने रस्त्याच्या कडेला उभ्या रिक्षाला धडक दिल्यानंतर पुढे जाऊन महिलांना धडक दिली. या अपघातात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून गोराई पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गणेश कवडे, प्रतिनिधी

गोराई बीचवर भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यानंतरही गाडी न थांबवता चालकाने बीच परिसरात उभ्या असलेल्या महिलांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी गोराई पोलिसांनी गाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालकाचं नाव श्रेयस शंकरलाल टेंबरे (वय २४) असं आहे. तो महिंद्रा कंपनीची एसयूव्ही गाडी चालवत होता. त्याने निष्काळजीपणे वाहन चालवत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली.

रिक्षाला धडक दिल्यानंतरही चालकाने गाडी थांबवली नाही. त्यानंतर पुढे जात त्याने बीचवर उभ्या असलेल्या काही महिलांना धडक दिली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेत चार महिलांना गंभीर दुखापत झाली.

या अपघातात दिपाली उर्फ जास्मिन सलीम कुरेशी (२९) यांच्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. विजेता दिपचंद गुप्ता (३१) यांच्या उजव्या पायाला तसंच पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जेनिफर प्रदिप सरकार (३५) यांच्या डोक्याला मुकामार लागला असून त्यांना रक्तस्त्राव झालाय. तर हेमा जयंती सिंग (२५) यांच्या उजव्या हाताला, खांद्याला आणि कोपराला दुखापत झाली आहे.

घटनेनंतर जखमी महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी गोराई पोलीस ठाण्यात आरोपी चालक श्रेयस टेंबरे याच्याविरोधात निष्काळजीपणे गाडी चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागील नेमकी परिस्थिती, वाहनाचा वेग आणि अपघात कसा घडला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2026 Date: नवरात्री 10 की 11 ऑक्टोबरला सुरू? तारीख नक्की जाणून घ्या

Gold Rate Today : सोने खरेदीदारांसाठी खुशखबर! १ तोळे इतक्या रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या 24k, 22k,18k चे ताजे दर

Duck Walk Benefits: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी करा डक वाॅक, २१ दिवसात दिसेल फरक

Amravati Teachers Constituency: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आमने-सामने; दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने वाढली रंगत

Maharashtra News Live Update: दादर-शिवाजी पार्क परिसरात CJP आंदोलकांवर पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT