coastal Road Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Coastal Road : मुंबईचा कोस्टल रोड की वॉटर पार्क? लोकांचा कोट्यवधीचा पैसा पाण्यात, पाहा व्हिडिओ

Mumbai Rain : मुंबईच्या कोस्टल रोड थेट वॉटर पार्क झालाय. कोस्टल रोडवर जागोजागी पाणीच पाणी पाहायला मिळतयं. त्यामुळे पुन्हा एकदा कोस्टल रोडच्या दुरावस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कोस्टल रोडवर वॉटर पार्क का झालं? पाहूयात...

Saam Tv

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

तुम्हाला वाटेल हे एखादं वॉटर पार्क आहे की काय पण नाही हा आहे मुंबईचा महत्वाकांक्षी कोस्टल रोड मुंबईकरांच्या वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या कोस्टल रोडची भरतीच्या लाटांनी वॉटरपार्क करून टाकलंय

या कोस्टल रोडवर आत्तापर्यंत किती खर्च झाला आहे ते पाहूया...

8 मार्गिकांचा आणि 29.2 किमी लांबीचा कोस्टल रोड

मरीनलाईन्सपासून कांदिवलीपर्यंत पश्चिम किनाऱ्यालगत

एकूण खर्च १३,९८३ कोटी रूपये

मात्र एवढा खर्च करूनही कोस्टल रोडची दुरवस्था वेळोवेळी समोर आलीय. याआधीही बोगद्यात पाणीगळती झाल्यामुळे कोस्टल रोडवरील वाहतुक आणि सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आता हाय टाईडमध्ये कोस्टल रोडवर साचलेल्या पाण्यातून वाहनांना मार्ग काढावं लागतोय.

महिन्याभरापूर्वी पहिल्या पावसात मुंबईतील भुयारी मेट्रोची अशीच अवस्था झाली होती. मुंबईची तुंबई होऊ देणार नाही, असं पावसाआधी आश्वासन नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकारी, देत असतात.तरी मुंबईकरांना दरवर्षी पावसाळ्यात याच परिस्थितीचा सामना करावा लागतो. एवढचं नाही तर नव्यानं उभारलेल्या रस्त्यांवर खड्डेही पडलेत..समृध्दी मार्ग ,कोस्टल रोड, मेट्रो रेल्वे आणि अटल सेतू या मोठमोठ्या प्रकल्पांमुळे दळणवळण जरी सुधारत असलं तरी या प्रकल्पांच्या गुणवत्तेचं काय..हा प्रश्न उरतोच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT