thane News  Saam tv
मुंबई/पुणे

Barvi Dam water Level : ठाण्यात कोसळधार! जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या धरणात पाणीसाठा वाढला, बारवी धरण किती टक्के भरलं?

Barvi Dam water Level update : ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या धरणात पाणीसाठा वाढला आहे. बारवी धरणासाठी वाढल्याने ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Mayuresh Kadav

मुंबईसह ठाण्यात पाऊस सक्रिय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे ठाण्यातील तलाव आणि धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात दुप्पटा पाणीसाठा पाहायला मिळत आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील धरणात पाणीसाठा वाढत असल्याने नागरिकांची पाणी चिंता लवकरच दूर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बदलापूर जवळील बारवी धरण 43 टक्के भरलं आहे. बारवी धरणात मागील वर्षीपेक्षा यावर्षी जवळपास दुप्पट पाणीसाठा जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. आतापर्यंत बारवी धरणात 789 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

मागील वर्षी आजच्या दिवशी बारवी धरण 25 टक्के भरलं होतं. मात्र आज बारवी धरणात 43% पाणीसाठा जमा झालय. बारवी धरणातून औद्योगिक क्षेत्रासह ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, अंबरनाथ ,बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. अशाच प्रकारे बारवी धरणात पाऊस सुरू राहिला तर लवकरच बारवी धरण विक्रमी वेळेत भरण्याची शक्यता आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात वाढ

राज्यात पाऊस सक्रिय झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांत सात तलावातील पाणीसाठ्यात १७,०४० दशलक्ष लिटर झाली आहे. सात तलावात एकूण ४ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. १५ जूनपासून तलाव क्षेत्रात पाणीसाठ्यात वाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पवईतील तलाव देखील वाहू लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: १४ वर्षीय मुलीचं बलात्कार, वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य

Aadhaar Address Update : आता घरबसल्या बदला आधारवरील पत्ता; नवीन Aadhaar App मुळे प्रक्रिया झाली सोपी

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT