Mumbai Water Storage Reaches 96.61% In Seven Major Lakes AI
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईकरांना मोठा दिलासा! ७ तलावांमध्ये ९६.६१ टक्के पाणीसाठा, जाणून घ्या सविस्तर

Mumbai Water Storage Update News : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये 13,98,318 दशलक्ष लिटर पाणीसाठा असून साठा 96.61 टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसामुळे धरण क्षेत्रात पुन्हा पाण्याची पातळी वाढली.

Alisha Khedekar

  • मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये 96.61 टक्के पाणीसाठा

  • सातही तलावांमध्ये मिळून 13,98,318 दशलक्ष लिटर पाणी साठले

  • पावसाने पुन्हा जोर धरल्याने धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत वाढ

मुंबई शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाचा एकूण पाणीसाठा काहीसा कमी आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आज सातही तलावांमध्ये मिळून 13,98,318 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता. हा साठा एकूण जिवंत साठवण क्षमतेच्या 96.61 टक्के इतका आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत सात तलावांमध्ये 14,24,164 दशलक्ष लिटर, म्हणजेच 98.40 टक्के पाणीसाठा होता. तर 2024 मध्ये 14,24,107 दशलक्ष लिटर (98.39 टक्के) पाणीसाठा नोंदवला गेला होता. त्यामुळे यंदा पाणीसाठा तुलनेने कमी असला तरी मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने स्थिती अद्याप समाधानकारक असल्याचे दिसून येते. सात तलावांपैकी विहार तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असून त्याचा साठा 100 टक्के आहे. तर तानसा तलावात 98.85 टक्के, भातसा तलावात 97.82 टक्के आणि तुळशी तलावात 96.89 टक्के पाणीसाठा आहे.

मध्य वैतरणा तलाव 96.42 टक्के भरला असून मोडक सागरमध्ये 93.66 टक्के, तर अप्पर वैतरणामध्ये 92.78 टक्के पाणीसाठा आहे. सध्या भातसा तलावात सर्वाधिक 7,01,399 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मध्य वैतरणामध्ये 1,86,600 दशलक्ष लिटर, अप्पर वैतरणामध्ये 2,10,653 दशलक्ष लिटर, तानसामध्ये 1,43,416 दशलक्ष लिटर, मोडक सागरमध्ये 1,20,756 दशलक्ष लिटर, विहारमध्ये 27,698 दशलक्ष लिटर आणि तुळशीमध्ये 7,796 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे.

दरम्यान, जलाशय परिसरात नुकत्याच झालेल्या पावसात मोडक सागर येथे 57 मिमी, मध्य वैतरणा 55 मिमी, विहार 45 मिमी, तानसा 36 मिमी आणि तुळशी येथे 25 मिमी पावसाची नोंद झाली. काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असल्याने राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने दमदार बॅटिंग केल्याने आज पुन्हा धरण क्षेत्रात पाण्याची पातळीत वाढ झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - उत्तर सोलापूर तालुक्यातील दुष्काळी भागांची पाहणी अंतिम टप्प्यात

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT