Rain Update Saam Tv
मुंबई/पुणे

Weather Update Today: मुंबईत पहाटेपासूनच पावसाची जोरदार हजेरी; विधानभवन परिसरातील शेड कोसळलं

आज पहाटेपासून मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे.

Shivani Tichkule

Maharashtra Rain Update: गेल्या काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज पहाटेपासून मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. पावसामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, मुंबईतील काही भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

आज दिवसभर मुंबईसह (Mumbai) उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मुंबई शहराला 3 दिवसाचा येल्लो अलर्टही देण्यात आला आहे. तर पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात (Pune) देखील आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विधानभवनातील शेड कोसळली

आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत असून मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस (Rain) पडत आहे. याचा फटका विधानभवन परिसरात तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या शेडला बसला आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने शेडवरील काहीसा भाग पडला होता. त्यानंतर पुन्हा शेड बांधण्यात आलेलं आहे.

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच विदर्भाच्या काही भागातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT