Badalapur Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Rain: बदलापूरला मुसळधार पावसाचा फटका, भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात कार बुडाली| VIDEO

Badlapur Rain: बदलापूरमध्ये तुफान पाऊस पडत आहे. या पावसामुळे बदलापूर बाजारपेठेमध्ये पाणी साचले आहे. अनेक दुकानात पाणी शिरले. उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. आणखी जोरात पाऊस झाला तर नदीला पूर येण्याची शक्यता आहे.

Priya More

मयुरेश कडव, बदलापूर

बदलापूरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने बदलापूरला चांगलंच झोडपून काढलं. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. बदलापूरमधील बाजारपेठेमध्ये पाणी भरलं आहे. तर उल्हासनदीने इशारा पातळी गाठली आहे. आणखी जोरात पाऊस झाला तर उल्हास नदीला पूर येण्याची शक्यता आहे. बदलापूरातील बेलवली भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्यात कार अडकली. क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात यश आले आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून व्हायरल होत आहे.

बदलापूरच्या रेल्वे भुयारी मार्गात पाणी साचलेलं असतानाही पाण्यातून कार घालण्याचा प्रयत्न चालकाच्या अंगलट आला. भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे ही कार पाण्यातच अडकून पडली. सुदैवानं कारचालक पाण्याबाहेर पडल्यामुळे तो सुखरूप आहे. क्रेनच्या सहाय्यानं ही कार आता बाहेर काढण्यात आली आहे. मुसळधार पाऊस पडत असताना कोणीही भुयारी मार्गातून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे उल्हासनगरमध्ये सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उल्हास नदी इशारा पातळीवर वाहत आहे. पावसाचा जोर वाढल्यास पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. काल रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. उल्हास नदीने 16.50 मीटर ही इशारा पातळी गाठली. पावसाचा जोर वाढल्यास पुराचा धोका असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

या पावसामुळे बदलापूरमधील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे बदलापूर बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरलं. बदलापूर स्टेशन परिसरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या कपडे आणि अन्य मालाचे मोठे नुकसान झालं आहे. पावसाचा जोर जर आणखी वाढला तर याठिकाणी असणाऱ्या दुकानांचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gyanesh Kumar: "ज्ञानेश कुमार चोर-डाकू, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!" मतचोरीवरून विरोधक एकवटले, दिल्लीतून मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Eye Exercises : चष्म्यापासून सुटका हवी? रोज ५ मिनिटे करा 'हा' व्यायाम, डोळ्यांची नजर होईल तीक्ष्ण

Pune Politics: अर्ज सुरू, फिल्डिंग जोरात; पण ‘तो’ उमेदवार कोण? पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मोठा ट्विस्ट

IND vs WI : सिराज आजही बाकावरच, या स्टार खेळाडूचा पत्ता कट, प्लेईंग ११ मध्ये कुणाला मिळाले स्थान?

SCROLL FOR NEXT