ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी अनेक थंड हवेचे ठिकाण आहेत. यामधील सर्वात सुंदर हिल स्टेशन म्हणजे खंडाळा हिल स्टेशन.
डोंबिवलीपासून फक्त ७३ किलोमीटर अंतरावर वसलेल्या या खंडाळा हिल स्टेशनला नक्की भेट द्या.
या सुंदर हिल स्टेशनची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६२२ मीटर आहे.
हिरवेगार डोंगर, आणि शांत वातावरण, कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. तुम्ही येथे ट्रेकिंगचा आणि कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता.
खंडाळामध्ये तुम्ही सेलिब्रिटी वॅक्स म्युझियमला भेट देऊ शकता. येथे तुम्ही तुमच्या आवडत्या बॉलिवूड स्टारचा मेणाचा पुतळा पाहू शकता.
खंडाळामधील द टायगर्स लीप या ठिकाणी भेट द्यायला विसरु नका. येथे एको पॉईंट देखील आहे. या ठिकाणाचे अद्भुत दृश्य पाहून तुम्ही थक्क व्हाल.
या ठिकाणी शोलेसह अनेक सिनेमांची शूटिंग झाली आहे. येथे तुम्ही रॉक क्लाइबिंग अॅक्टिव्हिटीचा देखील आनंद घेऊ शकता.