FATHER AND TWO DAUGHTERS KILLED IN BARAMATI TRUCK-BIKE ACCIDENT सकाळ
मुंबई/पुणे

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Baramati Accident News : बारामतीत ट्रकच्या धडकेत बाप व दोन मुलींचा मृत्यू झाला. हा अपघात खंडोबानगर चौकात घडला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Namdeo Kumbhar
  • बारामतीत ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने बाप व दोन मुलींचा मृत्यू झाला.

  • खंडोबानगर चौकात दुपारी १२ वाजता अपघात घडला.

  • वडील जागीच ठार झाले, तर दोन्ही मुली रुग्णालयात जाताना मृत्युमुखी.

  • पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले

Baramati road accident father and two daughters die : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात आज हृदयद्रावक घटना घडली आहे. दुचाकी ट्रकच्या खाली आल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. बापाचा जागेवरच मृत्यू झाला तर दोन चिमुकलीने रूग्णालयात जाताना प्राण सोडले. आज दुपारी १२ वाजता हा बारामतीमध्ये हा भयंकर अपघात झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरालय. एका हायवा ट्रकने (क्रमांक MH 16-CA-0212) दुचाकीला (क्रमांक MH 42-B-4844) जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार ओंकार राजेंद्र आचार्य आणि त्यांच्या दोन मुली, सई (वय 11) आणि मधुरा (वय 5) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने बारामतीत शोककळा पसरली आहे.

पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार आचार्य हे आपल्या दोन्ही मुलींसह दुचाकीवरून खंडोबानगर चौकातून जात होते. त्याचवेळी वेगाने येणाऱ्या हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत तिघेही ट्रकच्या मागील चाकाखाली सापडले. ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला, तर सई आणि मधुरा यांना तातडीने सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांनी हायवा चालकाला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

घटनास्थळी जमलेली गर्दी आणि मृतदेहांचे हृदयद्रावक दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेने आचार्य कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताने चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी खंडोबानगर चौकातील वाहतूक व्यवस्थापनावर सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Hiccups : रात्री उचकी लागून झोपमोड होतेय? दुर्लक्ष करू नका! शरीर देतेय 'या' आजाराचे संकेत

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर डिझेल चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ट्रकमधून ५०० लिटर डिझेल लंपास

Maharashtra Politics: मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी आणखी एका मंत्र्याचे अधिकार काढून घेतले, राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: २५ हजारांची पेन्शन थेट ८७,५०० रुपये होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत आतापर्यंतची मोठी अपडेट

SDRF boats capsize: मोठी दुर्घटना! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी उलटल्या; १० जवान बेपत्ता

SCROLL FOR NEXT