OBC Reservation Latest News Updates, OBC Reservation News Today  Saam TV
मुंबई/पुणे

OBC Reservation: ओबीसी आरक्षणावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होती या सुनावणीवर OBC राजकीय आरक्षणाचं पुढे काय होणार हे ठरणार होतं. मात्र, आता आजची सुनावणी न्यायालयाने सोमवारपर्यंत पुढं ढकलल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. (OBC Reservation Latest News Updates)

राज्य सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत केलेल्या कायद्याची आज कसोटी होती. राज्य सरकारने मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) धर्तीवर केलेल्या कायद्याबाबतच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होती. याच निकालावरतीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण (OBC Reservation) टीकणारं की नाही याचा देखील निर्णय होणार आहे.

राज्य़ सरकारने या कायद्याद्वारे निवडणुकांच्या तारखा आणि आरक्षित प्रभाग रचनेचे अधिकार स्व:ताकडे घेतले होते. मात्र, राज्य सरकारने केलेल्या या कायद्याला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केल्याने हा कायदा अडचणीत सापडला होता. यावरच आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती सर्वांचं लक्ष आजच्या सुनावणीकडे लागलं असतानाच न्यायालयाने ही सुनावणी पुढं ढकलली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT