Arogya Bharati Exam SaamTV
मुंबई/पुणे

आरोग्यभरती 'गट ड' परीक्षा पुन्हा होणार, टोपेंनी दिली मोठी अपडेट

आरोग्य भरतीच्या गट ड वर्गाचा पेपर व्हायरल झाला होता, त्यामुळे...

साम टिव्ही ब्युरो

पुणे: राज्यात आरोग्य भरती परीक्षेच्या घोटाळ्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. आरोग्य भरतीचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला होता. आरोग्य भरतीच्या गट ड वर्गाचा पेपर व्हायरल झाला होता, त्यामुळे आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात मागच्या काळात आरोग्य भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहेत. आरोग्य भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात विधानसभेत आश्वासन दिले होते. पोलिसांना सखोल चौकशी करण्यासंदर्भत आदेश दिले होते.

पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर पूर्ण व्हायरल झाला होता, त्यामुळे आम्ही पुन्हा 'ड' वर्गाची परीक्षा घेणार आहोत असे राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा झाली आहे. दोन्ही ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेऊ. मंत्री मंडळाचा निर्णय आहे त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय यात झाला असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.

कोरोनामुळे राज्यात दोन वर्ष स्पर्धा परीक्षा वेळेवर झाल्या नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणार उमेदवार निराशेत होते. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण कमी होवू लागले आणि परीक्षा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. परंतु टीईटी परीक्षा, आरोग्य भरती, म्हाडा या परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचे पेपेर फुटल्याचे समोर आले. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी मोठे रॅकेट सर्वांसमोर आले. त्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले होते. राज्याच्या विधानसभेतही हा मुद्दा चांगलाच गाजला होता.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

SCROLL FOR NEXT