Rajesh Tope  Saam TV
मुंबई/पुणे

आरोग्य विभागाची पुन्हा परीक्षा देणाऱ्यांकडून फी घेणार नाही; आरोग्यमंत्र्यांची माहिती

पुन्हा परीक्षा देणाऱ्यांकडून फी घेणार नाही, कुणाची वयोमर्यादा संपत असेल तर त्याबाबत देखील विचार केला जाणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : आरोग्य विभागाची रद्द झालेली पदभरती परीक्षा पुन्हा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी (Examination fee) घेणार नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. ते म्हणाले, 'आरोग्य पदभरती परीक्षा (Health Recruitment Examination) घेण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली आहे. पुन्हा परीक्षा घेण्याचा विषय फाईलवर घेऊ, कॅबिनेट जे निर्णय घेईल, त्यानुसार परीक्षा घेण्याचा विचार असल्याचंही आरोग्यमंत्री म्हणाले.

तसंच सरकारमधील प्रमुख लोकांशी चर्चा केल्यावर २ दिवसात निर्णय ठरेल. मात्र, पुन्हा परीक्षा देणाऱ्यांकडून फी घेणार नाही, कुणाची वयोमर्यादा संपत असेल तर त्याबाबत देखील विचार केला जाणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

हे देखील पाहा -

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Health Department) गट क आणि गट ड पदांसाठी झालेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला होता. आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड एकूण ६२०५ पदांच्या भरतीसाठी सरळसेवा परीक्षा झाल्या होत्या. परंतू या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार होत्या परंतू नियोजित तारखेच्या काही तास आधीच ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. नंतर ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांचे पेपर आधीच फुटल्याचे पोलिसांच्या तपासाअंती स्पष्ट झाल्याने या परिक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.

मंकी पॉक्सबाबत काळजी करण्याचं कारण नाही -

मंकी पॉक्सची भारतात एकही केस नाही. हा आजार हवेतून प्रसारित होत नाही, तो माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने तो पसरतो. पुरळ येणं, ताप येणं ही लक्षण आहेत. मात्र, काळजी करण्याचं कारण नाही. प्रादुर्भाव असलेल्या देशातून आपल्याकडे येणाऱ्या लोकांचं विमानतळावर स्क्रिनिंग केलं जातं असून काही लक्षण आढळली तरी त्यांचे स्वब NIP ला पाठवत असल्याची माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Maharashtra : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! ८ हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार; कारण काय?

Ahilyanagar Fort : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

Famous Actress : स्टेज ४ कॅन्सरशी झुंज सुरू, किमोथेरपीने होतोय भयंकर त्रास; तरीही प्रसिद्ध अभिनेत्री करतेय चित्रपटाचे शूटिंग

नाश्त्यासाठी बनवा स्वादिष्ट पालक पनीर पराठा; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT