cm Eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

फेरीवाला समाजाचा शत्रू नाही त्यांनाही जगण्याचा अधिकार, त्यांनीही शिस्त पाळावी - मुख्यमंत्री

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने आयोजित स्वनिधी महोत्सवाच्या सांगता समारंभात त्यांनी ऑनलाईन संवाद साधला

प्रदीप भणगे

मुंबई - कोरोना (Corona) काळात हातावर पोट असलेल्या घटकांचे सर्वात जास्त नुकसान झाले अशा घटकांना पुन्हा उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) विविध योजना राबविण्यात आल्या यातील योजनांच्या माध्यमातून फेरीवाला महिला बचतगट याना पुन्हा उभारी मिळाली आहे. यंत्रणा म्हणून त्यांची दखल घेत त्यांना सुरक्षा देणे, त्यांना जागा देणे आतापर्यंत व्हायला हवे होते मात्र ते तितक्या प्रमाणात झालेले नाही हे मान्य करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेरीवाला हा समाजाचा शत्रू नाही त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे मात्र त्यांनीही आपला कोणाला त्रास होणार नाही याचे भान ठेवून शिस्त पाळावी असे आवाहन डोंबिवलीत केले.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने आयोजित स्वनिधी महोत्सवाच्या सांगता समारंभात त्यांनी ऑनलाईन संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचायत राजमंत्री कपिल पाटील, महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते . मुख्यमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर फेरीवाल्यांनी आमचे निवेदन घ्या असं सांगितलं मात्र पालिका अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं एकूण न घेतल्याने संतापलेल्या फेरीवाल्यांनी पालिका प्रशासन विरोधात घोषणाबाजी केली.

हे देखील पाहा -

केंद्र शासनाने स्वनिधी महोत्सवासाठी देशातील 75 शहरांची निवड केली यामध्ये कल्याण डोंबिवलीचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली महापालिके तर्फे स्वानिधी महोत्सव म्हणजेच स्वावलंबी पथ विक्रेत्यांचा महोत्सव डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले कलामंदिरात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी महिला बचत गटामधील अनेक महिलांनी घरी बनवलेल्या कापडी पिशव्या, खाद्य पदार्थ, बांगड्या, घरगुती वस्तू प्रदर्शनात आणल्या होत्या. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी या महिलांचे कौतुक केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ऑनलाईन उपस्थितीती दर्शवली होती.

यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी फेरीवाला, पथ विक्रेते ,महिला बचत गटांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली तर या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील फेरीवाल्यांना मार्गदर्शन केलं . सोनी ची महोत्सव राबवल्याबद्दल कल्याण डोंबिवली महापालिकेचा अभिनंदन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.

मुख्यमंत्र्याचे भाषण संपताच फेरीवाल्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपले म्हणणे ऐकून घयावे अशी विनंती केली मात्र त्यांचे म्हंनने एकूण न घेतल्याने चिडलेल्या फेरीवाल्यांनी गोंधळ घालत पालिक प्रशासना विरोधात घिषणाबाजी केली. यावेळी फेरीवाल्यांनी आपल्याला व्यवसायासाठी कर्ज दिले प्रोत्साहन पर योजना राबविल्या मात्र आम्ही व्यवसाय करायचा कोठे? असा सवाल करत आम्हाला जागा द्या अशी आर्त विनवणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT