hapus amba arrives in bulk at apmc market navi mumbai saam tv
मुंबई/पुणे

Hapus Amba : आंबाप्रेमींनाे! वाशी एपीएमसीत हापूसची विक्रमी आवक, जाणून घ्या पेटीचा दर

APMC Market Vashi : आता पुन्हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हापूस आंब्याची माेठ्या प्रमाणात आवक झाली आहे. यामुळे आंबाप्रेमींत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News :

एपीएमसी (Agriculture Produce Market Committee) फळ बाजारात हापूस आंब्याची (alphonso mango) मोठी आवक झाली आहे. हापूस आंब्याच्या तब्बल साडे तीनशे पेट्या एपीएमसी फळ बाजारात दाखल झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात एवढी आवक ही ऐतिहासिक असल्याचे व्यापा-यांसह संजय पानसरे (संचालक, एपीएमसी फळ बाजार) यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. (Maharashtra News)

एपीएमसी फळ बाजारात जानेवारीच्या दुस-या आठवड्यापासून आंब्याची आवक हाेऊ लागली आहे. यामुळे आंबा विक्रेत्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. आता पुन्हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हापूस आंब्याची माेठ्या प्रमाणात आवक झाली आहे.

दरम्यान यंदा आंब्याचा हंगाम हा मोठा असला तरी एप्रिल महिन्यात होणारी आवक कमी असेल असा अंदाज देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त साम टीव्हीशी संवाद साधताना व्यक्त केला. सध्या हापूस आंब्याची पेटी 7 हजार ते 12 हजार रुपयांना मिळत आहे. एका पेटीत साधारणत: चार ते पाच डझन आंबे असतात. हापूस आंबा खाणा-यांत देखील आनंदाचे वातावरण आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Home Fraud: घर देण्याच्या बहाण्याने मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून सुरू धावपळ

Maharashtra News Live Update: पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

Fitness Tips : घरबसल्या मिळवा जिमसारखा फिटनेस; फक्त ५ मिनिटांचा Workout

मोठी बातमी! चाकणकरांच्या जागी महिला प्रदेशाध्यक्षपदावर या महिला नेत्याची वर्णी, सुनेत्रा पवारांनी सोपवली सूत्रं

SCROLL FOR NEXT