Hanuman Chalisa Mumbai Dadar Police serves notice to MNS leader Yashwant Killedar Saam Tv
मुंबई/पुणे

Hanuman Chalisa : मनसे नेते यशवंत किल्लेदार यांना पोलिसांनी बजावली नोटीस

Yashwant Killedar Latest News: राजकीय आणि प्रक्षोभक भाषणे, घोषणाबाजी, आक्षेपार्ह बॅनरबाजी झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटिशीत म्हटलं आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना भवनाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी भोंग्यावर हनुमान चालीसा लावली होती. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती. या कारवाईनंतरही हनुमान जयंतीला शिवसेना भवनाबाहेर (Shivsena Bhavan) हनुमान चालीसाचं पठण करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली होती. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज, शनिवारी पोलिसांनी मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांना नोटीस बजावली आहे. (Hanuman Chalisa Mumbai Dadar Police serves notice to MNS leader Yashwant Killedar)

हे देखील पहा -

मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हनुमान जयंतीला शिवसेना भवनाबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर आज, शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी पोलिसांनी खबरदारी म्हणून यशवंत किल्लेदार यांना नोटीस बजावली आहे. राजकीय आणि प्रक्षोभक भाषणे, घोषणाबाजी, आक्षेपार्ह बॅनरबाजी झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटिशीत म्हटलं आहे.

यशवंत किल्लेदार यांना पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसे कार्यकर्त्यांना पोलीस नोटीस बजावतात; मग दादरमध्ये शिवसेनेकडून महाआरती करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना नोटीस का बजावली जात नाही, असा सवाल किल्लेदार यांनी उपस्थित केला आहे. तत्पूर्वी, हनुमान जयंती साजरी करत असताना राजकीय व प्रक्षोभक भाषणे, घोषणाबाजी, आक्षेपार्ह बॅनरबाजी झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याबाबत दादर पोलिसांकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, आज सकाळी 'सामना'च्या कार्यालयाबाहेर मनसेकडून खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT