Versova Accident Video
Versova Accident Video संजय गडदे
मुंबई/पुणे

Accident Video: सुसाट डंपरच्या धडकेत हातगाडी चालक जागीच ठार; वर्सोवातील थरारक घटना CCTVत कैद

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

संजय गडदे,मुंबई

Versova Accident Video: मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा बंदराजवळील अरुंद रस्त्यावर सुसाट धावणाऱ्या डंपरच्या धडकेत एका हातगाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा सगळा थरार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सुसाट धावणाऱ्या डंपरने रस्त्यावरून हातगाडी घेऊन चालणाऱ्या हातगाडी चालकाला जोरदार ठोकर मारल्याने झालेल्या अपघातात हातगाडी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. वर्सोवा पोलिसांनी आरोपी डंपर चालकाला सीसीटीव्ही फुटेच्या आधारे अटक केली आहे. (dumper accident in Versova)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मासळीची हातगाडीवरून वाहतूक करणारा हातगाडी चालक वर्सोवा बंदराकडे निघाला होता. यावेळी पाठीमागून सुसाट वेगात आलेल्या डंपरने (Dumper) त्याच्या हातगाडीला जोरात धडक (Accident) दिली. रस्ता अरुंद असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीची भिंत आणि हातगाडी यांच्यामध्ये हातगाडीचालक दाबला गेला, या दुर्देवी अपघातात हातगाडी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

या संपूर्ण घटनेचा थरार त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (CCTV) कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन मयत हातगाडी चालकाचे शव महापालिकेच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वर्सोवा पोलिसांनी आरोपी डंपर चालक अमीनदीन दरेसाहेब दर्गा वय (57 वर्ष) यास अटक केली असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain News : राज्यभरात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचं थैमान; मुंबईत धुळीचं वादळ

Jogeshwari Rain News | नारळाचं झाड थेट रिक्षावर कोसळलं! एक जण गंभीर जखमी

Ghatkopar Hoarding Collaps News | थरारक! महाकाय होर्डीग पेट्रोलपंपवार कोसळले, शेकडो माणसे अडकल्याची भिती..

Mumbai Rain News | मुंबईकरांनो बाहेर घराबाहेर पडताना काळजी घ्या!

Maharashtra Election Voting LIVE : सीएसटीवरून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल उशीराने धावणार

SCROLL FOR NEXT