हातोड्याने जीवघेणा हल्ला दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

Pune: एकतर्फी प्रेमातून मुलीवर हातोड्याने जीवघेणा हल्ला!

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तरुणाचा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

दिलीप कांबळे

दिलीप कांबळे

मावळ: एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) अल्पवयीन मुलीवर तरुणाचा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. वारंवार पोलीस स्टेशनला (Police Station) तक्रार दिल्याच्या रागातून तरुणाने हातोड्याने केलेल्या हल्ल्यात एक सतरा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हातोडीचा घाव डोक्यात बसल्याने रक्तबंबाळ झालेल्या मुलीला पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ही घटना तळेगाव दाभाडे येथील मुख्य बाजारपेठ जवळ घडली आहे. शिवम शेळके, असे आरोपीचे नाव आहे. (Pune Latest Crime News)

नेमकं काय झालं?

पीडित मुलीने काही दिवसांपूर्वी आरोपी तरुण त्रास देत असल्याची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला दिली होती. तो राग डोक्यात ठेवून आरोपीने हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. पीडित मुलगी बाजारपेठेतून दुचाकीवरून जात असताना आरोपीने तिच्यावर पाठीमागून हल्ला केला.

हे देखील पहा-

डोक्यात हातोडीचा घाव बसल्याने मुलगी गंभीर जखमी झाली असून तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहे. आज आरोपीला कोर्टात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कस्टडी मा. वडगांव कोर्टाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : वनडे सीरीजआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; स्टार खेळाडू संघाच्या बाहेर

७ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, महागडी घड्याळं... DIG च्या घरात कोट्यवधींचं घबाड, VIDEO

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर ट्रकला लागली भीषण आग! पाहा थरारक VIDEO

Lawyer-Judge verbal spat: डोन्ट क्रॉस द लिमिट! वकिलानं न्यायाधीशांना रोखठोक सुनावलं, हायकोर्टातच ड्रामा

Eyeliner Tips: आयलायनर लावण्यासाठी सोप्या टिप्स; डोळ्यांना द्या परफेक्ट लूक

SCROLL FOR NEXT