Mumbai News google
मुंबई/पुणे

Mumbai News: कुर्ल्यातील हमीदा मानवी तस्करीचे शिकार, पाकिस्तानात पोहोचली अन् युट्यूबर बनला देवदूत

Hamida Banu Story: कुर्ल्यातील एक महिला मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकल्या होत्या. त्यामुळे त्या पाकिस्तनात पोहोचल्या होत्या. मात्र तिथल्या एका यूट्यूबरमुळे त्या पुन्हा एकदा मायदेशात परतल्या आहेत.

Dhanshri Shintre

पाकिस्तानातील कोण एक युट्युबर पाकिस्तानात अडकलेल्या एका महिलेचा व्हिडिओ काढतो काय, तो व्हिडिओ व्हायरल होतो काय आणि २२ वर्षांनंतर ती महिला आपल्या मायदेशी परतते काय, एखाद्या बॉलिवूड चित्रपटाच्या कथानकासारखी ही कहाणी आहे हमीद बानू यांची ज्या तब्बल २२ वर्षांनंतर आपल्या मायदेशी परतल्या आहेत.

आपल्या पोटच्या पोरांसाठी हमीदा बानु दुबईला काम करायला निघाल्या. मात्र त्यांचं दुर्दैव असं की त्यांची फसवणूक होते आणि त्या थेट पाकिस्तानात जाऊन पोहोचतात. परकीय देशात आपल्याला ओळखणारा कोणी नाही, मदत करणारा कोण नाही, परतीचा मार्ग नाही अशा दुष्टचक्रात त्या अडकून पडतात आणि वयाची २२ वर्ष अशीच निघून जातात.

परतीचे सगळे मार्ग बंद झालेले असताना अचानक एक युट्युबर वालिउल्ल मारूफ देवदूता सारखा त्यांच्या आयुष्यात येतो, त्यांची सगळी कहाणी ऐकून तो देखील व्हिडिओ काढतो. व्हिडिओत हमीदा कोण आहेत, त्यांच्या मुलांची नावे मुलांच्या नवऱ्यांची नाव त्यांचा परिसर या सगळ्याचा उलगडा करतात. हा व्हिडिओ व्हायरल होत होत अखेर पोहोचतो कुर्ला कुरेशी नगर येथील त्यांच्या मुलांकडे आणि दोन दशकांचा शोध अखेर संपतो.

भारताचा शत्रू नंबर एक अशी पाकिस्तानची ओळख आहे. भारताविरोधात सतत कारस्थान रचणे, आपल्या देशावर दहशतवादी हल्ले करणे हे पाकिस्तानचे उद्योग मात्र त्याच पाकिस्तानच्या जनतेने भारतीय असून देखील हमीदा यांना सांभाळून घेतलं. त्याचा त्या आवर्जून उल्लेख करतात. दोन दशकांहून अधिक वर्ष पाकिस्तानात अडकून पडलेल्या हमीदा बानू यांनी अखेर पाकिस्तानात संसार थाटला. खरे तर आपल्या मुलांची ओढ त्यांना कायम सतावत राहिली. पाकिस्तानात त्या नेहमी आपल्या मुलांची आठवण काढत असत, पुन्हा भारतात मायदेशी आपल्या कुटुंबीयांकडे परतण्याची त्यांना एकदा पाहण्याची स्वप्न बघत असत आणि २२ वर्षांनी का होईना त्यांच हे स्वप्न अखेर पूर्ण झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात लपलाय 'हा' भव्य-सुंदर पुरातन किल्ला, येणाऱ्या सुट्टीत येथे भेट द्या

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

Veen Doghatli Hi Tutena : समर-स्वानंदीचं लग्न मोडणार? 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा VIDEO

Pune : पुण्यात शिवसेना-भाजप संघर्ष? रासनेंचा धंगेकरांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, घरातील खोडकर मुलांना घेऊन पुढे जायचं

Akola Fire : अकोल्यात भल्या पहाटे अग्नितांडव, जेजे मॉलला लागली भीषण आग

SCROLL FOR NEXT