Mulund News Saam tv
मुंबई/पुणे

Mulund News : माझ्याकडे का पाहतो? रागाच्या भरात जीम ट्रेनरने लाकडी मुदगल तरुणाच्या डोक्यात घातलं, Video

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईच्या मुलुंडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलुंडमध्ये एका जिम ट्रेनरने एका तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नवघर पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मुलुंडमध्ये एका जिम ट्रेनरने जिम करण्यास आलेल्या तरुणाच्या डोक्यात व्यायाम करण्यास वापरण्यात येणारा लाडकी मुदगल मारल्याची घटना घडली आहे. मुलुंडमधील एका जिममधील हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मुलुंडमधील फिटनेस इंटलिजियस जिममधील प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मुलुंड येथील फिटनेस इंटलिजियस जिममधील मारहाणीची बुधवारी संध्याकाळची घटना आहे. युगेश शिंदे हा २० वर्षीय तरुण या जिममध्ये जिम करत असताना या जिममधील ट्रेनर द्यरव नाकेल याने त्याला ही मारहाण केली आहे. युगेश त्याच्याकडे पाहत असल्याच्या रागातून त्यानेही मारहाण केली आहे. या प्रकरणी युगेशच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

माजी मंत्र्यांच्या पीएवर कोयत्याने हल्ला

माजी मंत्री सुरेश नवले यांच्या पीएवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली आहे. माजी मंत्री सुरेश नवले यांच्या पीएवर कोयत्याने हल्ला केला. घरासमोर थांबलेले असताना २ जणांनी कोयत्याने वार केले. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला. तर पीए ललिल अब्बड यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT