Uddhav Thackeray Interview  Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : ज्ञानेश कुमार म्हणजे अडाणी कुमार, उद्धव ठाकरेंचा घणाघात; पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray, Gyanesh Kumar : मुंबईतील गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी सरकार, अमित शाह आणि निवडणूक आयोगावरही ठाकरेंनी गंभीर आरोप करत लोकशाहीच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray speech against Gyanesh Kumar : मुंबईत पार पडलेल्या विरोधकांच्या भव्य 'गर्जना मोर्च्यात' शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. "हा मोर्चा म्हणजे केवळ राजकीय आंदोलन नसून हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीच्या रक्षणाचा लढा आहे," असे सांगत त्यांनी उपस्थित जनसागराचे आभार मानले.

आपल्या घणाघाती भाषणात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले.

मेक इन इंडिया नाही, ही हुकूमशाही!

पंतप्रधान मोदींवर टीका करताना ठाकरे म्हणाले, पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी 'मेक इन इंडिया'ची घोषणा केली होती. मात्र, आज ते देशात हुकूमशाही राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तुम्ही हुकूमशाह बनणार असाल, तर जनता तुमची ही हुकूमशाही मोडून काढल्याशिवाय राहणार नाही.

ज्ञानेश कुमार यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. ते म्हणाले की, ज्ञानेश कुमार हे केंद्र सरकारचे हत्यार बनले असून ते अडाण्यासारखे काम करत आहेत. ज्ञानेश कुमार म्हणजेच अडाणी कुमार आहेत. त्यांना दिलेले सुरक्षा कवच तर राष्ट्रपतींपेक्षाही जास्त आहे. देश काय ज्ञानेश कुमार यांच्या बापाचा आहे का?

निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीवर आक्षेप

सगळ्या संस्थांचे उत्तम उदाहरण म्हणजे आयुक्तांची नेमणूक. राष्ट्रपतींची निवडणूक होते, मग मुख्य निवडणूक आयुक्तांची का होत नाही? आधी या प्रक्रियेत सरन्यायाधीश (CJI) होते, पण सरकारने कायदा बदलून त्यांना बाहेर काढले. राहुल गांधी यांनी हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना थांबण्याचे आवाहन केले होते, तरीही सरकारने पक्षपातीपणा करण्यासाठी ज्ञानेश कुमार यांची तातडीने नेमणूक करून टाकली, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला.

१३ कोटी मतदार वगळल्याचा गंभीर आरोप

देशभरातून तब्बल १३ कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. पश्चिम बंगालमध्येही मोठ्या प्रमाणावर नावे हटवण्यात आली असून लोकांनी पुनर्नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. या प्रकरणी सुनावणीसाठी सतत 'तारीख पे तारीख' पडत आहे, असे ठाकरे म्हणाले. तसेच नागरिकत्व रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयुक्तांचा नाही, तर तो देशाच्या गृहमंत्र्यांचा आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.

इंडिया अगेन्स्ट वोट चोर सरकार

जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा आपण भाजपसोबत होतो. त्यांनी काँग्रेस भ्रष्ट असल्याचे वातावरण तयार केले. पण आज देशात 'इंडिया अगेन्स्ट वोट चोर सरकार' अशी स्थिती निर्माण झाली आहे. जे काँग्रेसच्या काळात घडले नाही ते यांनी केले. आज देशात जेवढ्या शिव्या या पंतप्रधानांना पडत आहेत, तेवढ्या इतिहासात कोणालाही पडल्या नव्हत्या.

बंगालमधील फौजेचा वापर अन् गृहमंत्र्यांवर टीका

देशाचे सैन्य हे भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर जाते. मात्र, अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये एका महिला मुख्यमंत्र्याविरुद्ध (ममता बॅनर्जी) फौज घुसवावी, ही कसली लोकशाही? ही लोकशाही नसून सूडाचे राजकारण सुरू आहे असा हल्लाबोल केला.

बांगलादेशी घुसखोरी अन् भाजपवर वार

सरकार सांगते की आम्ही बांगलादेशी शोधत आहोत. देशाच्या सीमा जर सुरक्षित आहेत, तर हे बांगलादेशी महाराष्ट्रात घुसतातच कसे? सुवेंदू अधिकारींसारखे गद्दार नेते लोकांची नावे मतदार यादीतून बाद करण्याची आणि रेशन बंद करण्याची धमकी देत आहेत.

या सरकारने कसल्या कसल्या चोऱ्या केल्या आहेत. त्यांनी राम मंदिरातील दान चोरी केले आणि आमचा मूळ पक्षच चोरला. चोरी करायची आणि पोलीसही आपलेच ठेवायचे, असा यांचा प्रकार सुरू आहे. पूर्णेकरांसारख्या नेत्यांची हत्या होत आहे आणि देशभरात महिलांवर अत्याचार होत आहेत. तुमचे सरकार नेमके कुठे आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हा तर पहिला मोर्चा, शेवटचा नाही!

भाषणाचा शेवट करताना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला आक्रमक होण्याचे आवाहन केले. "आज प्रचंड ऊन आहे, सूर्य आग ओकत आहे. पण जोपर्यंत तुमचे डोके तापत नाही, तोपर्यंत या देशात बदल घडणार नाही. हा आपला पहिला मोर्चा आहे, हा शेवटचा नाही. या सत्ताधीशांचे गुढघे टेकवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही," असा इशारा देऊन त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी भाजपकडून ५ पैकी ३ उमेदवारांची घोषणा

Amla Benefits : रोज फक्त 1 आवळा, शरीरात होतील हे 9 मोठे बदल; केसांपासून त्वचेपर्यंत मिळेल फायदा

Raj Thackeray: महाराष्ट्रात झालेला SIR रद्द करा, राज ठाकरेंची निवडणूक आयोगाविरोधात गर्जना

Pitru Paksha 2026: पितृपक्षात केस कापावेत की नाही? जाणून घ्या काय सांगते धार्मिक मान्यता

मोठी बातमी: भाजपकडून शिक्षक-पदवीधरसाठी उमेदवारांची यादी जाहीर! नागपूर, पुण्यातून 'हे' चेहरे मैदानात

SCROLL FOR NEXT