Gunratna Sadavarte saam tv
मुंबई/पुणे

गुणरत्न सदावर्तेंची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस जाहीर, तर...

गुणरत्न सदावर्ते यांची जीभ हासडणाऱ्यास रोख अकरा लाख तर त्त्यांच्या हातात बांगड्या भरणाऱ्या महिलेला पाच लाख रुपये व तोंडाला काळे फासणाऱ्या ५१ हजारांचे बक्षीस जाहीर

मंगेश कचरे

बारामतीत: कामगारांमध्ये हस्तक्षेप करून एसटी कर्मचार्‍यांच्या भावना भडकावून, भाषणे करून, आक्षेपार्ह वक्तव्य करून संकट निर्माण करत शरद पवारांच्या (Sharad Pawar) बारामतीत 12 तारखेला येऊन बारा वाजता मोर्चा काढून हल्ला करीन असे म्हणत पवारांच्या अस्मितेला धक्का देण्याचे काम गुणरत्न सदावर्ते यांनी केले होते. त्या सदावर्तेची आम्ही बारामतीत वाट पाहत असून भविष्यात सदावर्तेच काय पण त्या मनोवृत्तीचे लोक बारामतीत पाऊल टाकले तर त्यांची जीभ हासडणाऱ्यास रोख स्वरूपात अकरा लाखाचे बक्षीस देण्यात येईल.

महिलांच्या रोजीरोटीचा जर प्रश्न निर्माण होत असेल तर त्याच्या हातामध्ये जी महिला भगिनी बांगड्या घालेल तर त्या भगिनीस पाच लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे, तसेच तोंडाला काळे फासणाऱ्यास ५१ हजार रुपयाचे बक्षीस देखील बारामतीत जाहीर करण्यात आले आहे. आज बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील महिला व कामगारांनी सदावर्तेच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता यावेळी ही बक्षिसे जाहीर करण्यात आले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगडच्या निजामपूर भागाला पावसाचा जोरदार फटका

Flood Video : पुराच्या पाण्यातून वाट काढत होता, बघता बघता वाहून गेला तरूण; थरारक व्हिडिओ

Maharashtra Politics : शिंदे गटाला झटका, महिला नेत्याचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंना भाजपचा धक्का, आमदाराच्या भावासह ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

SCROLL FOR NEXT