Petrol fire stunt for a birthday reel in Goregaon West raises serious safety concerns among residents. saam tv
मुंबई/पुणे

रील की जीवाशी खेळ? वाढदिवसाला पेट्रोल ओतून रस्त्यावर लावली आग

Man Sets Petrol Fire For Birthday Reel In Goregaon Mumbai: गोरेगावमध्ये वाढदिवसाच्या रीलसाठी पेट्रोल ओतून रस्त्यावर आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे रस्त्याचे नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात वाढदिवसाच्या रीलसाठी धोकादायक कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. जोगेश्वरी पश्चिम येथील कार डीलर फहाद शेख याने वाढदिवसानिमित्त रील तयार करताना राम मंदिर रोडजवळील सोमाणी ग्राम परिसरात, सनटेक सिटी 4th Avenue निवासी संकुलाबाहेरील रस्त्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे एमएमआरडीएच्या रस्त्याचे चार ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच घटनास्थळी जवळच अनेक वाहने उभी असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. आग भडकली असती तर पार्क केलेल्या वाहनांनाही फटका बसू शकला असता, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या धोकादायक प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी जीव धोक्यात घालून सोशल मीडियासाठी रील बनवण्याच्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.बिनु वर्गीस यांनी मुंबई पोलिसांना ट्विट करून केली आहे. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी आणि संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला

Vasai Virar Metro: आता वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; नवीन मार्ग प्रस्तावित; १७ स्थानके असणार; मार्ग कसा असणार?

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT