गोपीचंद पडळकर सुशांत सावंत
मुंबई/पुणे

Wine in Supermarket: ...त्यामुळेच राऊतांचं 'झिंग झिंग झिंगाट' झालं आहे- पडळकर

ठाकरे सरकारने वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. दुकानामधून आणि सुपर मार्केटमध्ये (Wine In Supermarket) वाईन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: ठाकरे सरकारने वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. दुकानामधून आणि सुपर मार्केटमध्ये (Wine In Supermarket) वाईन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आता दुकानातून आणि सुपर मार्केटमधून वाईन उपलब्ध असणार आहे. यावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांनी निशाणा साधत म्हणलं आहे की, "मद्यराष्ट्र करुन ठेवलं आहे, अशी टीका केली आहे. आता भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांचे ‘ झिंग झिंग झिंगाट ‘ झालेत, असे पडळकर म्हणाले.

पडळकर म्हणाले की, जनाब संजय राऊत हे मा. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘ झिंग झिंग झिंगाट ‘ झालं आहे.

ते म्हणाले, "जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi Government) काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावच्या गाव अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला."

"जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का?की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार. परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही." असे म्हणत त्यांनी सरकारला डिवचलं आहे.

हे देखील पहा-

पुढे ते म्हणाले, "मा. शरदचंद्र पवारांच्या (Sharad Pawar) नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खुप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी डावललं, कोळी बांधवांचा आरोप; मंडळाकडून मोठं वक्तव्य, सांगितलं...

Shocking : १५ दिवसांच्या मुलाला फ्रिजरमध्ये ठेवून आई झोपी गेली; महिलेच्या कृत्याने खळबळ

Crime News: अनैतिक संबंधात नवरा अडसर बनला, घराजवळच मृतदेह गाडला, चित्रपटापेक्षा भयानक घटना

Accident News : गावी परतताना काळाचा घाला; बसची मोटारसायकलला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

देवाभाऊंच्या 'त्या' जाहिरातींवर तब्बल 40 ते 50 कोटी खर्च; संजय राऊतांचा गंभीर आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT