Good news for the citizens of Mumbai lake water storage in increased Modak Sagar Tansa Vaitarna Dam Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Lake Water: मुंबईकरांसाठी खुशखबर! तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; पाणीकपातीचं संकट टळणार?

Mumbai Lake Water Lavel Today: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये मिळून एकूण 97.07 टक्के जलसाठा जमा झाला आहे.

Satish Daud

Mumbai Lake Water Lavel Today: ऑगस्ट महिन्यात मुंबईकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पुनरागमन केलं. मुंबईत अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात देखील वाढ झाली. (Latest Marathi News)

मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai News) करणाऱ्या सात तलावांमध्ये मिळून एकूण 97.07 टक्के जलसाठा जमा झाला आहे. हा जलसाठा 364 दिवस पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून तुर्तास तरी पाणीकपातीचं संकट टळलं आहे.

मुंबईत अजूनही ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता (Rain Alert) हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे तलावांमधील जलसाठ्यात आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभर पावसाने ओढ दिल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले होते.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा

- विहार आणि तुळशी तलाव सध्या 100 टक्के भरलेले आहेत

- मोडक सागर - 99.52 टक्के

- तानसा - 98.69 टक्के

- भातसा- 98.20 टक्के

- मध्य वैतरणा - 97.68 टक्के

- अप्पर वैतरणा तलाव - 90.19 टक्के भरलेला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT