Diwali Special Train for Mumbai Nagpur route Saam TV
मुंबई/पुणे

Diwali Special Train: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, दिवाळीनिमित्त 'या' मार्गावर स्पेशल ट्रेन धावणार; प्रवाशांचं टेन्शन मिटणार

Satish Daud

Diwali 2023 Special Train

दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजीला गावी जाण्यासाठी प्रवासी प्रचंड गर्दी करीत आहेत. हीच बाब घेता मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून आणखी ९ स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे. नागपूर ते सीएसएमटी, सीएसएमटी ते दानापूरदरम्यान या गाड्या धावणार आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथून मुंबईला येण्यासाठी गुरुवारी रात्री स्पेशल ट्रेन सोडण्यात येईल. ही ट्रेन १६ नोव्हेंबरला रात्री १० वाजता सुटून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता पोहोचेल.

या गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर या स्थानकांत थांबा देण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबईहून दानापूर येथे जाण्यासाठी सीएसएमटी-दानापूर स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे.

ही ट्रेन १८ आणि २५ नोव्हेंबरला सकाळी ११.५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता दानापूरला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरिता ही ट्रेन १९ आणि २६ नोव्हेंबरला दुपारी साडेचार वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री सव्‍वाअकरा वाजता सीएसएमटीला येईल.

सीएसएमटी-दानापूर या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्थानकांत थांबा देण्यात आला आहे. विशेष गाड्यांसाठी आरक्षणाची सुविधा असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT