Good news For Pune Citizens khadakwasla temghar pavana varasgaon dam water level increase Saam TV
मुंबई/पुणे

Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी गुड न्यूज, धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; पावसाची संततधार ठरली गेमचेंजर

Pune Dam Water Level News: खडकवासला प्रकल्पातील वरसगाव , पानशेत ही दोन्ही धरणे १०० टक्के फुल्ल झाली आहेत. याशिवाय टेमघर धरणातील पाणीसाठा आता ७६ टक्क्यांवर आहे.

Satish Daud

Pune Dam Water Level News Today

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे शहरासह परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या नाले तुडूंब भरून वाहत असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पावसाची संततधार अशीच सुरू राहिली, तर प्रकल्पातील धरणे १०० टक्के भरतील, असा विश्वास जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडाठाक गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस (Rain News) होईल, अशी अपेक्षा पुणेकरांना होती. गणपती बाप्पाच्या आमनाबरोबरच पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे.

खडकवासला प्रकल्पातील वरसगाव , पानशेत ही दोन्ही धरणे १०० टक्के फुल्ल झाली आहेत. याशिवाय टेमघर धरणातील पाणीसाठा (Pune Dam Water Leval) आता ७६ टक्क्यांवर आहे. पुढील काही दिवस पाऊस असाच सुरू राहिल्यास टेमघर धरण भरल्यास १०० टक्के प्रकल्प फुल्ल होण्याची शक्यता आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्याने पुणेकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असून पाणीकपातीचं संकट देखील टळलं आहे. सध्या पानशेत, वरसगाव तसेच मुळशी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

खडकवासला धरण: १.४४ ७२.८३ टीएमसी पाणीसाठा

पानशेत धरण: १०.६५ १०० टीएमसी पाणीसाठा

वरसगाव धरण: १२.८२ १०० टीएमसी पाणीसाठा

टेमघर धरण: २.८३ ७६.३७ टीएमसी पाणीसाठा

भामा आसखेड धरण: ७.६७ १०० टीएमसी पाणीसाठा

पवना धरण: ८.५१ १०० टीएमसी पाणीसाठा

उजनी धरण: ११.७४ २९.९१ टीएमसी पाणीसाठा

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT