ive Police Security to Manoj Jarange Patil BJP MLA Nitesh Rane Wrote Letter to CM Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil: 'मनोज जरांगे पाटील यांना पोलीस सुरक्षा द्या', भाजप आमदाराची मागणी

Manoj Jarange Patil Security: 'मनोज जरांगे पाटील यांना पोलीस सुरक्षा द्या', भाजप आमदाराची मागणी

Satish Kengar

Manoj Jarange Patil Security:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणावर बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणाला स्थगिती दिली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. अशातच आता जरांगे पाटील यांना राज्य सरकार मार्फत सुरक्षा पुरवली जावी, अशी मागणी होत आहे. ही भागानी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

जरांगे यांना पोलीस सुरक्षा द्यावी, अशी मागणी करताना राणे यांनी पत्रात लिहिलं आहे की, ''उपरोक्त विषयान्वये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांचे कार्य प्रेरणा देणारे असून समाजासाठी त्यांचे जीवन खूप मौल्यवान असल्यामुळे त्यांना शासनातर्फे त्वरित पोलिसांची सुरक्षा देण्याबाबत योग्य ते सहकार्य करावी, अशी विनंती त्यांनी राज्य सरकारला केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगे यांची प्रकृती खालावली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी 9 दिवस उपोषण केलं. यानंतर सर्वपक्षीय विनंतीनंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जरांगे यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली आहे. मागच्या वेळी त्यांनी उपोषण केलं होतं त्यापेक्षाही सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. यावेळी त्यांना अधिक त्रास झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

जरांगे यांची दिवाळी रुग्णालयात जाणार?

जरांगे यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना डॉक्टरांनी आहे की, त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात राहावं लागणार आहे. यातच जरांगे यांची दिवाळी रुग्णालयात जाऊ शकते. असं असलं तरी तरी त्यांचा मराठा आरक्षणासाठी लढा अजूनही सुरूच आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शनमध्ये

दरम्यान, जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच अॅक्शनमध्ये आले आहेत. त्यांनी आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देताना म्हटलं आहे की, ''मराठा आरक्षणासाठी आजपासून युद्धपातळीवर कामाला सुरूवात करा. एक महिना ड्राईव्ह मोडमध्ये काम करा. सरकारने शब्द दिला आहे, तो पूर्ण करायचा आहे. त्यामुळे आपल्याला कारणं सांगता येणार नाही. एक एक मिनिट, एक एक तास आपल्याला महत्वाचा आहे. सरकार प्रामाणिक पणे प्रयत्न करत आहे हे लोकांना कळलं पाहिजे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT