पुणकरांना तातडीने शिथिलता द्या; महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी facebook/Muralidhar Mohol
मुंबई/पुणे

पुणेकरांना तातडीने शिथिलता द्या; महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांना पुण्यातील निर्बंध तातडीने कमी करा अशी मागणी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीचा पाहणी दौरा केला यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा धोका अजून कमी झालेला नाही त्यामुळे कोरोनाबाबत सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या. तसेच दुकानदार व्यावसायिकांच होणारं नुकसान आम्हाला समजतय मात्र लोकांचे जीव महत्वाचे आहेत असही मुख्यमंत्री म्हणाले. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनारुग्णांचे प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये दुकने रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देणार असल्याचे सुतोवाचही ठाकरे यांनी यावेळी केले मुख्यमंत्र्यानी केले.Give immediate relaxation to the people of Pune; Mayor's demand to CM

याच पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौरांनी मुख्यमंत्र्यांना पुण्यातील निर्बंध तातडीने कमी करा अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शिथीलता देण्याबाबत जे विधान केलं त्याबाबतीत लवकरात लवकर आदेश काढावेत अशी मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

तसेच गेल्या 15 दिवसांपासून मी सरकारकडे निर्बंध करण्याबाबत पाठपुरवठा करतोय मात्र त्यावरती कोणताच निर्णय घेतला जात नसल्याचही महापौर मोहोळ म्हणाले. ज्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी आहे त्या ठिकाणचे निर्बंध कमी केले जाणार आहेत हाच धागा पकडत पुण्यामधील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांच्या खाली असून पुणे शहर लेव्हल 2 मध्ये आहे, तरीसुध्दा पुणेकरांना शिथीलता दिली जात नाही अशी खंतही मोहोळ यांनी व्यक्त केली.

दरम्यान राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने शहरातील लसीकरण मागील तीन दिवसांपासून बंद असल्याचही महापौर मोहोळ यांनी सांगितलं.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT