Child Girl sexual abuse Saam TV
मुंबई/पुणे

Panvel Crime: नराधम आजोबाकडूनच साडेचार वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट

Panvel Crime News: आरोपी आजोबा हा प्रत्येक शनिवारी रविवारी पनवेल तालुक्यातील आपल्या मूळ गावी पत्नी आणि नातीसोबत जात होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

Panvel Crime News: नवी मुंबईच्या पनवेल (Panvel) भागात राहणाऱ्या एका 62 वर्षीय वृद्धाने आपल्याच साडे चार वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी आजोबा हा प्रत्येक शनिवारी रविवारी पनवेल तालुक्यातील आपल्या मूळ गावी पत्नी आणि नातीसोबत जात होता. या दरम्यान हा नराधम आजोबा संधी साधून आपल्या नातीसोबत लैंगिक चाळे करत होता. (Navi Mumbai Crime News)

पीडित मुलीला लघुशंका करण्यास त्रास झाल्याने आईने विचारणा केली असता सदर प्रकार समोर आला. पीडित मुलीच्या आईने सदर प्रकारची माहिती आपल्या पतीला दिली होती. मात्र पतीने आरोप खोडून काढत पत्नीला गप्प केले. मात्र सदर प्रकार वाढल्यावर आईने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. (Sexual Assault On Child Girl)

याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कलमाअंतर्गत नराधम आजोबावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र 15 दिवस उलटूनही पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नसून नराधम आजोबा अद्यापही मोकाट असल्याने पोलिसांप्रती संताप व्यक्त करण्यात येतोय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

SCROLL FOR NEXT