molested saam tv
मुंबई/पुणे

Molested : दहावीतील विद्यार्थिनीवर घडलेल्या प्रसंगामुळे पालक संतापले; शिक्षकावर शाळा कारवाई करणार का ?

या घटनेमुळे पालक वर्गात मात्र तीव्र संतापाची लाट उसळली.

अजय दुधाणे

बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. (badlapur latest marathi news)

बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेतील एक शिक्षक पीटी आणि भूगोल याचे तास घेतात शनिवारी सकाळच्या सुमारास त्याने शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला क्रीडा साहित्याच्या रूममधून गाडीची चावी आणण्यासाठी पाठवलं. (Maharashtra News)

त्यानंतर तिच्या मागे मागे जात त्याने क्रीडा साहित्याच्या रूमचा दरवाजा बंद केला व विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या प्रकाराची माहिती विद्यार्थिनीने पालकांना देताच पालकांनी तिला घेऊन बदलापूर पूर्व पोलीस (police) स्टेशन गाठलं.

पालकांनी शिक्षकाविरोधात तक्रार केली. त्यानुसार बदलापूर पूर्व पोलिसांनी संबंधित शिक्षकावर विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पालक वर्गात मात्र तीव्र संतापाची लाट उसळली असून अशा शिक्षकांवर फक्त पोलिसांनीच नव्हे तर शाळेने (school) सुद्धा कठोर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून केली जातेय.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेले 130 मोबाईल मालकांच्या हाती

Maharashtra News Live Update: डी. वाय पाटील यांना पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात

SCROLL FOR NEXT