Mumbai Local Incident News : मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकावर एक काळीज धडधडवणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३० वर्षीय तरुणाने अचानक ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर (OHE) उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नागरिकांमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या भयानक दुर्घटनेत विजेचा तीव्र झटका लागल्याने तरुण ४५ टक्के भाजला आहे. त्याशिवाय त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या या तरुणावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचा तपास केला जात आहे.
मंगळवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी घाटकोपर रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. ३० वर्षीय तरुणाने लोकल ट्रेनच्या छतावर चढून ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरला स्पर्श केला. या घटनेमुळे मध्य रेल्वेची उपनगरीय लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली होती. ही घटना सायंकाळी सुमारे ६.३३ वाजता प्लॅटफॉर्म ३ वर घडली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडून टिटव्याकडे जाणारी लोकल घाटकोपर स्टेशनवर थांबली त्यावेळी ही दुर्घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, ३० वर्षांचा तरूण ट्रेनच्या छतावर चढला आणि वरच्या ओव्हरहेड वायरला स्पर्श केला. रिपोर्टनुसार, तो व्यक्ती ४५ टक्के भाजला आहे. त्याची छाती, पोट आणि दोन्ही हात भाजले आहेत. त्या व्यक्तीच्या डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे.
राजावाडी रुग्णालयाच्या डॉ. भारती राजुलवाला यांनी सांगितले की, त्या व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर देखरेख ठेवली जात आहे. त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली असून पुढील स्कॅनचा अहवाल येणे बाकी आहे. त्याची प्रकृती खालावल्यास त्यांना सायन रुग्णालयात हलवता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.