Ghatkopar Hoarding Bhavesh Bhide Arrest 
मुंबई/पुणे

Ghatkopar Hoarding Collapse Case: घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! उदयपूरमधून भावेश भिंडेला अटक

Ghatkopar Hoarding Bhavesh Bhide Arrest : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य तब्बल ६० तासांनंतर पूर्ण झालं. सोमवारी १३ मे रोजी मुंबई शहर आणि उपनगरत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घटकोपरमधील पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळलं होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी या दुर्घटनेतील आरोपी भावेश भिडेला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. भिडेला उदयपूरमधून अटक करण्यात आलीय. गेल्या तीन दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा होता. आज अखेर मुंबई गुन्हे शाखेने भिंडेच्या मुसक्या आवळल्या.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य तब्बल ६० तासांनंतर पूर्ण झालं. सोमवारी १३ मे रोजी मुंबई शहर आणि उपनगरत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घटकोपरमधील पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळलं होतं. या दुर्घटनेत ७५ जण जखमी झाली झाले होते तर १६ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील जबाबदार आरोपीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.

घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या हे होर्डिंग अनधिकृत असल्याची बाब समोर आलीय. या होर्डिंगचा मालक भावेश भिडे असून तो घटना घडल्यापासून फरार होता. आज शेवटी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केलीय. तीन दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. सतत लोकेशन बदलत असल्याने पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. आज शेवटी मुंबई गुन्हे शाखेने भिंडेच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान घाटकोपर येथील दुर्घटना ३ दिवसांपूर्वी घडली होती. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे १२० x१२० फुटांच्या होर्डिंग तुटल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. यात १६ जणांची मृत्यू झाला. पडलेल्या होर्डिंगखाली कोणी अडकलं आहे, का याचा शोध एनडीआरएफ टीम, सेन्सर आणि श्वानपथकाच्या साहाय्याने घेतला गेला.

दरम्यान या घटनेनंतर बीएमसीने मध्यरेल्वे आणि पश्चिम रेल्वेला सर्व बेकायदेशीर होर्डिंग्स किंवा ४०x४० फूट आकाराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्राधान्याने काढून टाकण्याचे आदेश दिलेत. बीएमसीने १,०२५ मोठ्या आणि लहान होर्डिंग्सचे ऑडिट देखील सुरू केले आहे. वाऱ्याचा वेग सहन करण्याची क्षमता, जमिनीपासून होर्डिंगची उंची, आसपासची रचना इत्यादी बाबी लक्षात घेत ऑडिट केल्या जात आहेत. हे ऑडिट करण्याचं काम महिनाअखेरीस पूर्ण होणार आहे.

दुर्घटनेचा व्हिडिओ पहा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बिलबोर्ड पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळला. पाऊस आणि सोसाट्याचा वारा चालू असल्याने काही वाहने पेट्रोल पंपाच्या आडोशाला थांबले होते तर काही वाहने इंधन भरण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी पंपावर असलेलं बील बोर्ड कोसळले. एका अहवालानुसार, १०० फूट उंच आणि २५० टन वजनाच्या लोखंडी होर्डिंगखाली अनेक कार, दुचाकी आणि लोक दबले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT