घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळल्याच्या अपघातामध्ये आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर या होर्डिंगखाली १० ते १२ लोकं अडकली असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढतच आहे. आतापर्यंत या घटनेमध्ये १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरूच आहे. या दुर्घटनेतील जखमींवर सरकारमार्फत मोफत उपचार केले जात आहेत. घाटकोपरमधील इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत असलेल्या पोलीस ग्राऊंड शेजारील पेट्रोल पंपावर ही दुर्घटना घडली आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत होर्डिंगखाली १० ते १२ जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. १३ मे रोजी दुपारी घाटकोपरमध्ये (Petrol Pump Caught Fire) पेट्रोल पंपावरील होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळलं होतं. तेव्हा सुमारे १०० ते १५० लोकं या होर्डिंगखाली अडकल्याचं सांगितलं जात होतं. अनेकांना वाचविण्यात बचाव पथकाला यश मिळालं आहे. या दुर्घटनेला ३६ तासांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे, तरीही घटनास्थळी अजून बचावकार्य सुरूच आहे.
होर्डिंग कोसळलेल्या पेट्रोल पंपाला आग (Mumbai News) लागल्याची देखील घटना घडली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असताना या पेट्रोल पंपाला आग लागली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. दुर्घटनास्थळी रेस्क्यु अजूनही सुरूच असल्याची माहिती मिळत (Ghatkopar Hoarding Collapse) आहे. मृतांचा आकडा १४ वरून १५ वर गेला आहे. आता मुंबईत अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली जाणार आहे.
घाटकोपरमध्ये दोन दिवसांपूर्वी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली (Ghatkopar Hoarding Collapse Death) होती. दोन दिवसांनंतर देखील घटनास्थळी बचावकार्य सुरूच आहे. या होर्डिंगच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएमसीने या व्यक्तीला दंड देखील ठोठावल्याची माहिती मिळत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केली आहे. या होर्डिंगच्या मालकाचं नाव भावेश भिंडे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.