Ghatkopar Building Part Collapse Saam TV
मुंबई/पुणे

Ghatkopar Building Part Collapse: घाटकोपरमधील इमारतीचा भाग कोसळला; २ जण अडकल्याची माहिती

Ghatkopar News: राजेवाडी रुग्णालय परिसरात असलेल्या दोन मजली बंगल्याचा काही भाग कोसळलाय.

जयश्री मोरे

Building Part Collapse: घाटकोपरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राजेवाडी रुग्णालय परिसरात असलेल्या दोन मजली बंगल्याचा काही भाग कोसळलाय. या घटनेत काही व्यक्ती अडकल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलंय. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटनेत एक वृद्ध महिला आणि एक पुरुष ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल होत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

अपघाताच्या या घटनेनं परिसरात एकच गोंधळ उडालाय. राजेवाडी रुग्णालयाबाहेर बघ्यांनी गर्दी केलीये. दोन मजली इमारत असलेल्या या बंगल्याच्या इतर भिंतींना देखील भेगा पडल्या आहेत. यामुळे आणखीन दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत काल सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसाने नागरिकांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर रस्त्यांवर देखील सखल भागात पाणी साचलंय. या पावसामुळेच बंगल्याच्या इमारतीचा काही भाग कोसळ्याचा अंदाज बांधला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

Ration Card New Rule: अंत्योदय अन्न योजनेत मोठा बदल; आता रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल ७ किलो धान्य

SCROLL FOR NEXT