Pune GBS Update Saam Tv
मुंबई/पुणे

Pune GBS Update: GBS ने टेन्शन वाढवलं! पुण्यात ९ वा बळी, ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू; राज्यातील मृतांचा आकडा १४ वर

Guillain-Barré Syndrome: पुण्यात जीबीएसने ९ वा बळी घेतला. पुण्यातल्या वाघोली येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाचा जीबीएस आजारामुळे मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यात जीबीएस आजारामुळे नागरिकांमध्ये भीती आणखी वाढली आहे.

Priya More

पुण्यामध्ये जीबीएस आजारामुळे चिंता आणखी वाढली आहे. जीबीएसने पुण्यात हात पाय पसरले असून आणखी एका जीबीएस रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुण्यामध्ये जीबीएसमुळे आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळे सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण पुण्यात जास्त आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. अशामध्ये पालिका प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात जीबीएसने ९ वा बळी घेतला आहे. पुण्यातल्या वाघोली येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाचा जीबीएस आजारामुळे मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या तरुणाला जीबीएसची लागण झाली होती. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाला श्वसनाला त्रास होत होता आणि स्नायू खूपच कमजोर झाले होते. ससून रुग्णालयात या तरुणावर ३ फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते.

उपचार सुरू असताना देखील या तरुणाचा त्रास काही कमी झाला नाही उटला त्याचा त्रास वाढत गेला. अखेर उपचारादरम्यान या तरुणाने प्राण सोडले. या तरुणाच्या मृत्यू नंतर पुण्यात जीबीएस रुग्णांच्या मृतांचा आकडा ९ वर गेला आहे. तर राज्यातील जीबीएस रुग्णांच्या मृत्यूचा आकडा १४ वर गेला आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.

दरम्यान, पुण्यामध्ये सध्या जीबीएसचे एकूण २१० रुग्ण आहेत. यामधील ४१ रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर उर्वरीत रुग्णांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. राज्यात जीबीएस आजार वेगाने हात पाय पसरवत आहे. राज्यातील पुणे, सोलापूर, मुंबई, नागपूर, सांगली, कोल्हापूर आणि धुळयामध्ये जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. पुण्यानंतर कोल्हापूरमध्ये ३ रुग्णांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT