GB Syndrome Outbreak Saam Tv
मुंबई/पुणे

GB Syndrome News : जीबीएसनं वाढवलं पुणेकरांचं टेंशन! जीबी सिंड्रोमची रुग्णसंख्या 101 वर, एकाच दिवसात 28 जणांना लागण

Guillain-Barre Syndrome in Pune : जीबी सिंड्रोमने पुण्यात थैमान घातलंय. क्रिकेटच्या स्कोअर बोर्डवर झटपट आकडे बदलावेत तशी रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. कशामुळे रुग्ण वाढतायत आणि यावर काय उपाययोजना केल्या जात आहेत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Snehil Shivaji

GB Syndrome Outbreak News : महाराष्ट्रातील आरोग्यव्यवस्थेचं लक्ष सध्या पुण्याकडे लागून राहिलंय. कारण राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचं आरोग्य बिघडलंय. पुण्यात जीबी सिंड्रोमनं डोकं वर काढलं असून पहिल्यांदाच एकाच दिवसात जीबी सिंड्रोम बाधित 28 नवे रुग्ण समोर आल्यानं खळबळ माजलीये. जीबी सिंड्रोम बाधित रुग्णांची संख्या आता एकाच आठवड्यात पाचपट झालीये. पुण्यात जीबी सिंड्रोमची सध्यस्थिती काय पाहुया.

पुण्याला जीबी सिंड्रोमचा विळखा

- पुण्यात जीबी सिंड्रोम बाधित रुग्ण संख्या 101 वर

- एकाच दिवसात 28 नवे रुग्ण समोर

- जीबी सिंड्रोम बाधित एका रुग्णाचा रविवारी मृत्यू

- 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक

- बाधित रुग्णांवर कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार

जीबी सिंड्रोमचा वाढता उद्रेक पाहता आरोग्य प्रशासन अँक्शनमोडमध्ये आलंय. तसंच नागरिकांना देखिल या आजारापासून बचावासाठी प्रशासनानं आवाहन केलंय. अशुद्ध अन्नपदार्थ आणि प्रदुषित पाण्यामुळे पसरणाऱ्या या आजारानं राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसह राज्यातील १३ कोटी नागरिकांची चिंता वाढवलीये. हा आजार कसा आणि कधी आटोक्यात येतो याचीच आता प्रत्येकाला प्रतिक्षा आहे. या आजारावर मात करण्यासाठी प्रत्येकानं सजग राहणं देखिल अत्यंत महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT